महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

संत्र्याचे हे जादुई फायदे माहित आहेत का? - BENEFITS OF ORANGE JUICE

Health Benefits Of Orange Juice: संत्र्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. त्वचा निखारायची असो, वा कोलेस्ट्रॅाल कमी करायचा असो सर्वच बाबतीत संत्रा उपयुक्त आहे.

Health Benefits Of Orange Juice
संत्र्याचा रस (ETV Bharat)

By ETV Bharat Health Team

Published : Oct 8, 2024, 5:36 PM IST

Updated : Oct 8, 2024, 6:23 PM IST

Health Benefits Of Orange Juice :संत्र्याचा रस प्यायला जेवढं चवदार, तेवढंच आरोग्यवर्धक आहे. याला सुपरफूड म्हणूनही ओळखलं जातं. यात व्हिटॅमिन ए आणि सी, सोडियम, कॅल्शियमस फायबर, मॅग्नेशियम आणि अ‍ॅंटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. हिवाळ्यामध्ये होणाऱ्या सर्दीपासून ते त्वचा संबंधित समस्यांपर्यंत संत्र्याचा ज्यूस फायदेशीर आहे. संत्राच्या ज्यूसमुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते. शिवाय वजन कमी करण्यासाठी देखील संत्र्याचा ज्यूस उत्तम आहे. त्याचबरोबर हिवाळ्यात उद्भवणाऱ्या डिहायड्रेशनच्या समस्येवरही संत्रा ज्यूस रामबाण आहे.

हाडं मजबूत : संत्र्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतं. जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे हाडं मजबूत होतात.

त्वचा निरोगी राहते:संत्र्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅंटिऑक्सिडंट्समुळे त्वचा निखारते. तसंच संत्र्याच्या ज्यूसमुळे निस्तेज त्वचा तेजस्वी दिसू लागते.

संत्र्याचा रस (ETV Bharat)

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर : शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी संत्रा ज्यूस फायदेशीर आहे. यात फायबरचं प्रमाण असल्यामुळे पॉलिमिथॉक्सिलेटेड फ्लेव्होनॉइड्स जलद गतीनं कोलेस्टेरॉल कमी करतात. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी संत्रा ज्यूस औषधांपेक्षा कमी नाही.

कर्करोगापासून संरक्षण :संत्र्यामध्ये आढळणाऱ्या डी-लिमोनिन संयुगं फुफ्फुसाचा कर्करोग तसंच त्वचेचा कर्करोगाशी लढण्यात मदत करते. तसंच संत्रा ज्यूस स्तनांचा कर्करोगापासून संरक्षण करते.

संत्र्याचा रस (ETV Bharat)

इन्फर्टीलिटीध्ये सुधारणा :संत्र्याचा ज्यूस मधील व्हिटॅमिन आणि अ‍ॅंटिऑक्सिडंट्स पुरुषांमधील शुक्राणूची कमजोरी दूर करते. यामुळे शूक्राणूंची क्वालिटी चांगली होते.

प्रसूती वेदना कमी : गरोदरपणामध्ये संत्री खाल्ल्यानं आईचे डोळे आणि त्वचा तसंच बाळाचं आरोग्य चांगलं राहातं. तसंच संत्र्याचं नियमित सेवन केल्यास प्रसूती वेदना कमी होतात.

नैराश्य कमी :आपल्यापैकी अनेक जण नैराश्याचे शिकार आहेत. कुणी कुटुंबिक तर कुणी ऑफिसच्या ताणामुळे नैराश्याचा शिकार होतो. परंतु लिंबूवर्गीय फळं मेंदूतील तणाव दूर करण्यासाठी फायदेशीर आहे असं तज्ञांच म्हणणे आहे.

संदर्भ

https://www.healthline.com/nutrition/orange-juice-benefits#TOC_TITLE_HDR_3

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. 'या' चहानं डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होईल छूमंतर
  2. त्वचेसह हृदयाच्या आरोग्यासाठी 'अंकुरित मूग' फायदेशीर
Last Updated : Oct 8, 2024, 6:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details