महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

सोन्यासारखी चमकतील पितळीची भांडी; वापरा ‘ही’ टेक्निक

पूजेसाठी वापरली जाणारी पितळीची भांडी स्वच्छ करणं कठीण काम आहे. परंतु खाली दिलेल्या टिप्सचा वापर करून पितळीची भांडी सोन्यासारखी चमकू शकतात.

How To Clean Brass Lamps
पितळीची भांडी (ETV Bharat)

By ETV Bharat Lifestyle Team

Published : 4 hours ago

How To Clean Brass Lamps: काही दिवसांवर दिवाळी येवून ठेपली आहे. अशातचं पूजेसाठी वारण्यात येणारी पितळीची भांडी किंवा दिवे स्वच्छ करणं सर्वांसमोर एक आव्हान असते. कारण रोजच्या पूजेसाठी वारले जाणारे पितळेचे दिवे काळे झाले असतात. तेल पूर्णपणे काढलं जात नसल्यामुळे त्यांच्यावर काळा थर जमा होतो. परिणामी कितीही घासून काढलं तरी पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छ ते होत नाही. बरीच मेहनत घेऊन देखील ते चमकत नाही. तुम्ही देखील या समस्येनं त्रस्त आहात काय? तर आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलोय. या ट्रिक्सचा वापर केल्यास तुमच्या घरातील पितळीची भांडी किंवा दिवे सोन्यासारखी चमकतील.

  • व्हिनेगर आणि लिंबाचा रस: व्हिनेगर आणि लिंबाचा रस हे दोन्ही एका भांड्यात समान प्रमाणात घेऊन मिश्रण बनवा. हे मिश्रण पितळीच्या भांड्यावर किंवा दिव्यावर लावा. त्यांच्या अम्लीय गुणधर्मामुळे पितळेच्या भाळ्यांवरील तेलकट आणि काळे डाग दूर होतात.
  • टूथपेस्टसह: प्रथम पितळीचे दिवे साबण किंवा डिटर्जंटने स्वच्छ करा. नंतर थोडी टूथपेस्ट त्यांच्यावर लावा. काही मिनिटांनंतर दिवे घासा यामुळे काळे पडलेले दिवे नवीन असल्यासारखे चमकू लागतील.
  • व्हिनेगर आणि मीठ: प्रथम, एका भांड्यात तीन चमचे व्हिनेगर आणि एक चमचा मीठ मिसळा. हे मिश्रण दिव्यांवर लावा आणि काही वेळ राहू द्या. त्यानंतर स्क्रबरने हळूवार स्क्रबिंग करा आणि टॅपखाली स्वच्छ धूवून घ्या. शेवटी कोरड्या कापडानं पुसून थोडावेळ उन्हात वाळवा.
  • लिंबाचा रस:लिंबाच्या रसात कापसाचा बोळा बुडवून पितळेच्या दिव्यांवर घासा. नंतर कोमट पाण्यानं स्वच्छ करा. यामुळे दिवे चमकू लागतील.
  • तांदळाचे पीठ किंवा चणाडाळ पीठ: एका भांड्यात पाणी, व्हिनेगर, तांदळाचं पीठ किंवा चणाडाळीच्या पीठाचे मिश्रण तयार करा. त्यानंतर या मिश्रणाचा जाड थर दिव्यांवर लावा. पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर साबण किंवा डिटर्जंटने धुवा. नंतर कोरड्या कापडाने पुसून टाका.
  • टोमॅटो केचप: टोमॅटो केचप पितळेच्या दिव्यांवर लावा तसंच मऊ टूथब्रशने घासून स्वच्छ करा. नंतर पाण्यानं स्वच्छ धुवा आणि कोरड्या कापडानं पुसून टाका. कॅचपच्या अम्लीय गुणधर्मामुळे त्यावर साचलेलं वंगण आणि काळे डाग दूर होतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details