महाराष्ट्र

maharashtra

By lifestyle

Published : 5 hours ago

ETV Bharat / health-and-lifestyle

वजन कमी करायचं? रोज सकाळी उठून प्या 'हा' पेय - Health benefits of Jeera water

Health benefits of Jeera water: जिरं प्रत्येक स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाल्याचा पदार्थ आहे. पदार्थाला चव देण्याखेरीज जिऱ्यामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दळलेले आहेत. चला तर जाणून घेऊया जिरा पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे.

Health benefits of Jeera water
वजन कमी करण्यासाठी जिरा पाणी (Getty Images)

Health benefits of Jeera water: जिरं प्रत्येक स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाल्याचा पदार्थ आहे. यामुळे जेवणाची चव तर वाढवतेच शिवाय आरोग्यासाठीही ते खूप फायदेशीर आहे. संशोधकांनी स्पष्ट केलं आहे की, जिऱ्याचं पाणी आरोग्याच्या विविध फायद्यांनी भरलेलं आहे. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि विविध रोगांपासून संरक्षण करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पचन सुधारण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत एवढेच नाही तर, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यापर्यंत जिऱ्याचं पाणी महत्त्वाचं आहे. जाणून घ्या दररोज जिऱ्याचं पाणी पिण्याचे फायदे.

जिऱ्यामध्ये अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्यात जीवनसत्त्वे ए, ई, सी, के, बी-व्हिटॅमिन, मॅग्नेशियम, मँगनीज, कॅल्शियम, फॉस्फरस, जस्त, पोटॅशियम यांसारखी खनिजे असतात. हे सर्व पोषक घटक आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा उत्सर्जित करतात. जिऱ्यामध्ये फॅट, सोडियम आणि कोलेस्ट्रॉल कमी असतं. त्याचप्रमाणे त्यातील काही विशेष संयुगे औषधांप्रमाणे काम करतात. उदाहरणार्थ, त्यात थायमॉल आणि जिरं अल्डीहाइड असतात. जे तुमचे पोट निरोगी ठेवते आणि हानिकारक जीवाणूंशी लढण्यास मदत करते. याशिवाय जिऱ्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे तुमच्या पेशींचे होणारं नुकसान टाळते.

  • जिऱ्याचे आरोग्यदायी फायदे
  • पचन सुधारते : जिऱ्याचे पाणी पचनास मदत करते. हे अन्न सहज पचण्यास मदत करते. जर गॅसमुळे तुमच पोट फुगल्यासारख वाटत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर जिरे पाणी उत्तम आहे. हे पोटातील अ‍ॅसिड रिफ्लक्स किंवा आम्लता कमी करते. त्यामुळे जीरा पाणी प्यायल्यानंतर पोट फुगण्याची किंवा जठरासंबंधीची समस्या होण्याची शक्यता कमी होते.
  • वजन कमी करणे :आजकाल बरेच लोक त्यांच्या वाढत्या वजनामुळे चिंतेत आहेत. जिरे पाणी प्यायल्यास चयापचय वाढवते. जे कॅलरीज बर्न करण्यास मदत करते आणि भूक नियंत्रित ठेवते. जिऱ्याच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे ए, सी, तांबे आणि मँगनीज असतात. यामुळे चरबी कमी करण्यासाठी मदत होते. तसंच शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढवते. परिणामी वजन कमी करण्यास मदत होते म्हणून, ज्या लोकांना त्यांचे वजन नियंत्रित करायचे आहे, त्यांच्यासाठी जिरे पाणी हा एक चांगला घरगुती उपाय आहे.
  • निरोगी त्वचा आणि केस: जिऱ्याच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर आहेत. यामुळे तुमची त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास मदत होते. त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे केसांना चमक आणि मजबूत करतात. तसंच, हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते. यामुळे शरीरातील विषारी घट बाहेर काढण्यास मदत होते.
  • हृदयाचे आरोग्य: जिऱ्याचं पाणी प्यायल्यानं शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि रक्तवाहिन्या शिथिल होतात. म्हणजे हृदयावर कमी दाब. जिऱ्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यानं कोलेस्ट्रॉलची पातळी, रक्तदाब नियंत्रित राहून हृदय निरोगी राहते.
  • रक्तातील साखरेचे नियंत्रण: इन्सुलिन रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. जिरे पाणी तुमच्या शरीरातील पेशींना इन्सुलिनसाठी अधिक संवेदनशील बनवते. यामुळे तुमच्या रक्तातील साखर स्थिर ठेवते यामुळे इंसुलिनचा वापर अधिक चांगला होतो. त्याचप्रमाणे अशक्तपणा असणाऱ्या रुग्णांसाठी जिऱ्याचं पाणी उत्तम असते कारण त्यात लोहाची भरपूर मात्रा असते. हे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास देखील मदत करते.

संदर्भ

ABOUT THE AUTHOR

...view details