महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

तालवाद्याचा किमयागार हरपला ; विख्यात तबलावादक उस्ताद जाकिर हुसैन यांचं निधन - ZAKIR HUSSAIN PASSES AWAY

सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद जाकिर हुसैन यांचं अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथल्या रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनानं अनेकांना धक्का बसला आहे.

Zakir Hussain Passes Away
उस्ताद जाकिर हुसैन (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 3 hours ago

हैदराबाद :जगविख्यात तबलावादक उस्ताद जाकिर हुसैन यांचं निधन झाल्यानं झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उस्ताद जाकिर हुसैन यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. उस्ताद जाकिर हुसैन यांचं निधन झाल्यानं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन :जगप्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद जाकिर हुसैन यांचं अमेरिकेत निधन झालं. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 9 मार्च 1951 रोजी मुंबईत जन्मलेल्या उस्ताद जाकिर हुसैन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2009 मध्ये त्यांना 51 व्या ग्रॅमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

रोनु मजुमदार यांनी 'ईटीव्ही भारतक'डे व्यक्त केल्या संवेदना (ETV Bharat)

झाकीर हुसैन यांनी चित्रपटातही केलंय काम : झाकीर हुसैन हे सुप्रसिद्ध तबलावादक अल्लाह राखा खान यांचे पुत्र होते. 'साझ' या चित्रपटात झाकीर हुसैन यांनी अभिनयही केला आहे. झाकीर हुसैन यांनी तबला वादनाचे धडे वयाच्या सातव्या वर्षापासून गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या 12 व्या वर्षापासून झाकीर हुसैन देशभरात त्यांनी तबला वादन परफॉर्म करण्यास सुरुवात केली होती.

हेही वाचा

  1. संविधानाच्या घेतलेल्या शपथे प्रमाणे आमचं सरकार काम करेल; मंत्रिमंडळ विस्तार होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
  2. "देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही" मंत्रिमंडळ विस्तारावर रामदास आठवले, नवनीत राणा नाराज
  3. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाचा समावेश? वाचा मंत्र्यांची यादी फक्त एका क्लिकवर...
Last Updated : 3 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details