मुंबई - जेनेलिया आणि रितेश देशमुख हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या जोडप्यानं 3 फेब्रुवारी 2012 रोजी मराठमोळ्या पद्धतीनं विवाह केला. यानंतर त्यांनी ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न केलं. जेनेलिया ही सासरी आल्यानंतर सर्व मराठी सण मोठ्या उत्साहाने साजरे करते. आता रितेश आणि जेनेलिया याच्याकडे ख्रिसमस सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या सणासाठी रितेशचे दोन्ही मुले आपल्या घरी ख्रिसमस ट्री सजवत असल्याचा व्हिडिओ जेनेलियानं शेअर केला आहे. रियान आणि राहीलची मदत त्यांचे वडील रितेश देखील व्हिडिओमध्ये करताना दिसत आहे.
ख्रिसमसची तयारी : गणेशोत्सव, दिवाळी हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केल्यानंतर आता रितेश आणि जेनेलियाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनची जोरदार करण्याच्या तयारीत आहेत. रियान आणि राहीलचा ख्रिसमस ट्री सजवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान जेनेलिया शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा मोठा मुलगा आणि रितेश दोघे मिळून ख्रिसमस ट्री वरचा भाग सजवत आहे, तर, धाकटा मुलगा राहील यावेळी ख्रिसमस ट्रीच्या खालील बाजू सजावट करत आहे. जेनेलियानं या व्हिडिओला शेअर करत यावर कॅप्शन देत लिहिलं 'हळुहळू ख्रिसमस सेलिब्रेशनची सुरुवात होत आहे.'
जेनेलिया आणि रितेशचं वर्कफ्रंट: दरम्यान, जेनेलिया आणि रितेश यांच्या मुलांच्या संस्कारांचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक केले जाते. रियान आणि राहील हे दोघेही पापाराझींसमोर नेहमीच हात जोडून नमस्कार करताना दिसतात. यामुळेच रितेश देशमुखचं कुटुंब अनेकांना आवडते. अनेकदा जेनेलिया आणि रितेश आपले कॉमेडी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. या जोडप्याचे हे व्हिडिओही चाहत्यांना खूप पसंत पडते. यावर अनेकजण प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. याशिवाय या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुढं रितेश 'रेड 2', 'हाऊसफुल्ल 5', 'मस्त 4', आणि 'राजा शिवाजी' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय जेनेलिया 'सितारे जमीन पर' या चित्रपटात झळकणार आहे.
हेही वाचा :
- रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांनी मित्रमंडळीबरोबर 'तांबडी चामडी' गाण्यावर केला जोरदार डान्स
- 'तुझे मेरी कसम' होणार 'या' दिवशी रुपेरी पडद्यावर पुन्हा प्रदर्शित, जाणून घ्या तारीख - Riteish Deshmukh
- रितेश देशमुखनं त्याच्या लेडी लव्ह जेनेलियाला मजेदार व्हिडिओ शेअर करून दिल्या शुभेच्छा, पाहा व्हिडिओ - genelia deshmukh birthday