ETV Bharat / state

पंडित नेहरुंवर रणजित सावरकरांचा जोरदार हल्लाबोल; राहुल गांधींच्या टीकेनंतर सावरकरांचे नातू मैदानात - RANJIT SAVARKAR

वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

RANJIT SAVARKAR
पत्रकारपरिषदेत बोलताना रणजित सावरकर (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

मुंबई : संसदेत संविधानाच्या प्रवासाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं झालेल्या विशेष चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपा सरकार आणि त्यांच्या विचारसरणीवर निशाणा साधला. सावरकरांच्या लेखनाचा दाखला देत राहुल गांधी म्हणाले की, "सावरकरांनी भारतीय संस्कृतीला अनुसरून संविधानाचा विचार केला नाही. त्यांनी मनुस्मृतीला भारतीय संस्कृतीचा खरा आधार म्हटलं. सावरकरांनी संविधान हटवून देशात मनुस्मृती लागू करण्याचा विचार केला होता," असा दावा राहुल गांधी यांनी संसदेत केला. सोबतच संविधान आणि मनुस्मृती हातात घेत राहुल गांधी यांनी भाजपा सावरकरांच्या विचारांना पाठिंबा देते का? असा सवाल उपस्थित केला. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण झाला असून, सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी आज (15 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधीचं विधान खोटं : प्रसारमाध्यमांशी बोलताना रणजीत सावरकर म्हणाले, "राहुल गांधींनी लोकसभेत वाचून दाखवलेला कागद कुठल्या गटारातून त्यांना मिळाला याची मला कल्पना नाही. प्रत्यक्षात मात्र सावरकरांनी मनुस्मृतीला एक ऐतिहासिक ग्रंथ म्हटलेलं आहे. मनुस्मृतीकडे धार्मिक ग्रंथ म्हणून पाहावं. राहुल गांधींनी केलेलं विधान खोटं आहे," असं रणजित सावरकर यांनी सांगितलं.

पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका : रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली. "नेहरूंनी अनेकदा संविधानाची पायमल्ली केली आहे. 10 मे 1947 ला लॉर्ड माऊंटबॅटन नेहरूंना घेऊन शिमल्याला गेले. तिथं माऊंटबॅटन यांनी नेहरूंना फाळणीची योजना सांगितली. मात्र नेहरूंनी त्याला विरोध करून फाळणीच्या वेळी होणाऱ्या रक्तपाताची जबाबदारी ब्रिटीशांनी न घेता भारतीयांनी घ्यावी, त्यासाठी मुस्लिम लीगला वाटेल ते द्यायला नेहरू तयार झाले. त्यामुळं नेहरूंना ब्रिटीशांचे एजंट म्हटलं, तर अतिशयोक्ती ठरणार नाही, अशी टीका रणजीत सावरकरांनी केली.

भारतीय संविधानाच्या निर्मितीवेळी सावरकरांच्या पुस्तकाचा आधार : रणजित सावरकर पुढे म्हणाले की, "स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1945 साली भारतीय संविधान कसं असावं, यासाठी समिती नेमून एक पुस्तक (Constitution of The Hindustan Free State) लिहिलं होतं. या पुस्तकात वीर सावरकरांनी लिहिलं होतं की, "कोणताही धर्म असू द्या, तो व्यक्तीच्या घरापुरता मर्यादित असावा. घराबाहेर सर्व धर्मातील नागरिकांना समान अधिकार असायला हवा." याच पुस्तकाचा आधार भारतीय संविधानाच्या निर्मितीवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता," असा दावा देखील रणजित सावरकरांनी केला आहे.

हेही वाचा

  1. "देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही" मंत्रिमंडळ विस्तारावर रामदास आठवले, नवनीत राणा नाराज
  2. महायुतीतील 39 आमदारांचा शपथविधी; भाजपा 19, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी घेतली शपथ
  3. "कोकणात असं काम करणार की, दिल्लीही मला बोलवेलं", मंत्रिमंडळातून डच्चू मिळ्यानंतर केसरकरांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.