मुंबई - अभिनेता अल्लू अर्जुनची हैदराबादच्या चंचलगुडा सेंट्रल जेलमधून 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आता अल्लू अर्जुनच्या कठिण काळात इंडस्ट्रीतील अनेक सहकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा त्याला पाठिंबा मिळत आहे. सेंट्रल जेलमधून बाहेर आल्यानंतर इंडस्ट्रीतील अनेक लोक अल्लू अर्जुनला त्याच्या जुबली हिल्स, हैदराबाद येथील निवासस्थानी भेटायला गेले होते. अभिनेता दग्गुबती व्यंकटेश, मंचू विष्णू, नागा चैतन्य यांच्यासह अनेक स्टार्सनं अल्लू अर्जुनची भेट घेतली. काही स्टार अल्लू अर्जुनला भेटल्यानंतर घराबाहेर जाताना स्पॉट झाले.
अल्लू अर्जुनच्या निवासस्थानी स्टार्सची गर्दी : गेल्या आठवड्यात अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2'च्या स्क्रीनिंगदरम्यान संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यूप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली होती. 'पुष्पा 2: द रुल'च्या प्रीमियरला उपस्थित राहण्यासाठी तो संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी गेला होता. दरम्यान शनिवारी सकाळी तेलंगणा उच्च न्यायालयानं त्यांची अंतरिम जामिनावर सुटका केली. सुटकेनंतर व्यंकटेश डग्गुबती अल्लू अर्जुनला भेटून त्याला आपला पाठिंबा दिला. सध्या चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार अल्लू अर्जुनला कठिण काळात पाठिंबा देत आहेत. दरम्यान अभिनेता राणा दग्गुबती आणि नागा चैतन्यनं अल्लू अर्जुनची गळा भेट घेतली. चिरंजीवीची पत्नी सुरेखाही आपल्या पुतण्याला भेटण्यासाठी त्यांच्या ज्युबली हिल्स येथील निवासस्थानी पोहोचली होती. यादरम्यान अभिनेता विजय देवरकोंडा आणि 'पुष्पा 2: द रुल'चे दिग्दर्शक सुकुमार अल्लू अर्जुनच्या निवासस्थानी दिसले होते.
अल्लू अर्जुनची तुरुंगातून सुटका : अभिनेता मंचू विष्णू देखील अल्लू अर्जुनला भेटल्यानंतर त्याच्या घरातून बाहेर पडताना दिसला. या व्यतिरिक्त अभिनेता अल्लू सिरिश, डीजे टिल्लू आणि सिद्दू जोन्नालगड्डा पुष्पराजच्या घरी स्पॉट झाला. तुरुंगातून सुटल्यानंतर अल्लू अर्जुन मीडियाशी बोलताना सांगितलं,"मी सर्वांच्या प्रेम आणि समर्थनासाठी आभारी आहे. मला माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. काळजी करण्यासारखे काही नाही, मी ठीक आहे. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि सहकार्य करेन. मी पुन्हा एकदा कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करू इच्छितो. ही दुर्दैवी घटना होती. हे सर्व अचानक घडले. जे काही झाले त्याबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करतो."
हेही वाचा :