मुंबई - Yodha Advance Booking: निर्माता करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसचा आगामी चित्रपट 'योद्धा' चित्रपटगृहात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट या शुक्रवारी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. दरम्यान निर्मात्यांनी चित्रपटाचे आगाऊ बुकिंगही जाहीर केलं आहे. करण जोहरनं मंगळवारी रात्री त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'योद्धा' चित्रपटाचे आगाऊ बुकिंगची घोषणा आणि नवीन टीझर शेअर केला. या चित्रपटाचा टीझर शेअर केल्यानंतर अनेकजण या पोस्टवर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
करण जोहरनं शेअर केली पोस्ट : करणनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिल, ''ही काळाविरुद्ध आणि भीतीनं भरलेल्या आकाशाविरुद्धची शर्यत आहे. 'योद्धा' या शुक्रवारी चित्रपटगृहात.'' या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. 'योद्धा'च्या टीझरमध्ये सिद्धार्थ सैनिकांच्या गणवेशात शत्रूंशी लढताना दिसतोय. याशिवाय यामध्ये सिद्धार्थ एक दमदार संवाद बोलताना म्हणतो, ''मी या पिक्चरचा हिरो आहे.'' व्हिडिओमध्ये, सिद्धार्थ देशाची प्रतिष्ठा आणि 200 अपहरण झालेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी शत्रूंशी लढत आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या 'योद्धा' या आगामी चित्रपटात साऊथ अभिनेत्री राशि खन्ना देखील दिसणार आहे.