मुंबई : दरवर्षी अनेक चित्रपट बनतात, त्यापैकी असे काही चित्रपट येतात, जे आठवणीत राहून जातात. यावर्षी असे काही चित्रपट रिलीज झाले होते, ज्यांची गाणी आणि संवाद अगदी लोकांच्या ओठावर होती. आजकाल अनेक चित्रपटांच्या डायलॉगवर देखील मीम्स बनतात. आम्ही तुमच्यासाठी यावर्षीच्या लोकप्रिय संवादांची यादी घेऊन आलो आहोत. या संवादांनी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकले आहेत.
1. पुष्पा 2: द रूल: यावर्षी 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'मध्ये असे अनेक संवाद आहेत, ज्यावर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या. आता या चित्रपटामधील डायलॉग पाहूया...
⦁ पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या? फ्लावर नहीं वाइल्ड फायर है मैं
⦁ मेरे हक का कोई भी पैसा हो, पुष्पा का उसुल, करेगा वसूल,
⦁ पुष्पा को नेशनल खिलाड़ी समझे क्या? इंटरनेशनल है मैं
⦁ पुष्पा नाम छोटा है लेकिन साउंड बहुत बड़ा
⦁ श्रीवल्ली मेरी बायको है और जब एक आदमी अपनी बायको की सुनता है तो क्या करता है, ये पूरी दुनिया को दिखाएगा
2. फायटर :हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर स्टारर 'फायटर' हा चित्रपट वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील देशभक्तीपर संवादांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती .
⦁ फाइटर वो नहीं जो अपने टारगेट अचीव करता है, वो है जो उन्हें ठोक देता है.
⦁ दुनिया में मिल जाएंगे आशिक कई पर वतन से हसीं सनम नहीं होता, हीरों में सिमटर सोने से लिपटकर मरते हैं कई पर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता.
⦁ तुझ जैसे टैरेरिस्ट की वजह से अगर हम बदतमीजी पर उतर आए तो तुम्हारा हर मोहल्ला आईओपी बन जाएगा, जय हिंद
3. लापता लेडीज :किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा महिला सक्षमीकरण या विषयावर आधारित चित्रपट आहे. यामध्ये अनेक दमदार संवाद आहेत, जे प्रेक्षकांना खूप आवडले होते.
⦁ एक बार घूंघट ले लिया तो आगे नहीं नीचे देख के चलना सीखो
⦁ बुड़बक होना शर्म का बात नहीं, बुड़बक होने पर गर्व करना ये शर्म का बात है