मुंबई- आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत असताना आपल्या मनातील स्त्रीत्वाच्या भावना व्यक्त केल्या जातात. आलिया भट्टनेही सोशल मीडियावर तिचा आनंद शेअर करून हा दिवस साजरा केला. तिने आपल्या जीवनात भेटलेल्या सर्व महिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि तिची मुलगी राहाने हा दिवस तिच्यासाठी कसा खास बनवला याचाही खास उल्लेख तिने केला आहे.
आपली चिमुकली मुलगी राहाने बनवलेला रेड हार्ट क्राफ्ट दाखवणारा एक फोटो आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. पोस्ट शेअर करताना आलियाने सर्व महिलांना केवळ या दिवशीच नव्हे तर प्रत्येक दिवस महिला दिन साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करणारा संदेश लिहिला. तिनं लिहिलं, "माझ्या घरातील लहान महिलेनं माझ्यासाठी हे बनवलंय. मी हे तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. आजचा हा दिवस आणि उर्वरीत सर्व दिवस साजरा करण्यासाठी एक मिनीट वेळ जरुर काढा."
तिने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी तिच्या पोस्टला प्रतिसाद दिला आणि आलियावर महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव केला. आजच्या दिवशी भरपूर प्रेम आणि मनापासून आदर पाठवत आहे त्याचा स्वीकार व्हावा, अशी विनंतीही एकानं केली आहे.