महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मुलगी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा हजर राहणार की नाही? "खामोश..." म्हणत केला खुलासा - Sonakshi Sinha wedding - SONAKSHI SINHA WEDDING

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल 23 जूनला मुंबईत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. दोघांचा हळदी समारंभ आज म्हणजेच २० जूनला होण्याची शक्यता आहे. शत्रुघ्न सिन्हा या जोडप्याच्या लग्नाला उपस्थित राहणार की नाही अशा चर्चा रंगल्या आहेत. अशावेळी स्वतः शत्रुघ्न सिन्हा यांनी याबाबत खुलासा केला आहे.

Sonakshi Sinha and Shatrughan Sinha
सोनाक्षी सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा ((ANI Photo))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 12:37 PM IST

मुंबई - Sonakshi Sinha Wedding: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल येत्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकणार आहेत. जसजसा त्यांच्या लग्नाचा दिवस जवळ येत आहेत, तसतसे त्यांच्याकडून नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. सध्या मीडियासह सर्वांच्या नजरा त्यांच्या कुटुंबीयांकडे लागल्या आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, नववधूचे वडील-अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की ते लग्नाला उपस्थित राहतील आणि तिला प्रेम आणि आशीर्वाद देतील.

नुकतेच एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या मुलीच्या लग्नाला उपस्थित न राहण्याच्या बातम्यांवर खुलासा केला आहे. त्यांनी या खोट्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. आपल्या मुलीबद्दल बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ''मला सांगा, हे कोणाच लाईफ आहे? ती माझी एकुलती एक मुलगी आहे. हे सोनाक्षीचे आयुष्य आहे, याचा मला खूप अभिमान आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. ती मला शक्तीचा आधारस्तंभ म्हणते. लग्नाला मी नक्की उपस्थित राहीन आणि का नसावं?''

शत्रुघ्न सिन्हा मुंबईत

शत्रुघ्न सिन्हा पुढं म्हणाले की, सोनाक्षीचा आनंद त्यांच्यासाठी सर्वात पहिला आहे. तिलाही तिच्या वडिलांबद्दल असंच वाटतं. त्यांनी असंही सांगितलं की त्यांच्या मुलीला तिचा जोडीदार निवडण्याचा आणि तिच्या इच्छेनुसार तिच्या लग्नाच नियोजन करण्याचा अधिकार आहे. ते म्हणाले, ''मी अजूनही मुंबईतच आहे. सोनाक्षी आणि झहीरला एकत्र आयुष्य जगायचे आहे. ते एकत्र छान दिसतात.'' त्यांनी जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

मुलीच्या लग्नाची खोटी बातमी पसरवणाऱ्यांसाठी शत्रुघ्न सिन्हा यांचा संदेश

या जोडप्याच्या लग्नाबाबतच्या खोट्या बातम्यांबाबत ते म्हणाले, "खामोश' या माझ्या खास डायलॉगद्वारे लग्नाबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना मी सावध करू इच्छितो, तुम्हाला इथं थारा नाही." 23 जूनला सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल मुंबईत लग्न करणार असल्याची बातमी आहे.

हेही वाचा -

अचानक थिएटरमध्ये पोहोचला कार्तिक आर्यन, बच्चे कंपनीच्या डोळ्यात आनंदाश्रू - पाहा व्हिडिओ - Chandu Champion show

कमल हासन आणि दीपिका पदुकोण 'कल्की 2898 एडी'च्या प्री-रिलीज कार्यक्रमात हजर - kamal haasan

जॉन अब्राहम, बॉबी देओल आणि अर्जुन रामपालची हाऊसफुल फ्रँचायझीमध्ये पुन्हा एन्ट्री - Housefull 5 Movie

ABOUT THE AUTHOR

...view details