मुंबई - 'पुष्पा: द रुल'मधील ट्रेलरमध्ये झळकलेल्या अर्धवट टक्कल असलेल्या एका पात्राच्या वेधक भूमिकेनं देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल अभिनीत, ब्लॉकबस्टर 'पुष्पा'चा बहुप्रतिक्षित सीक्वल, आधीच खूप चर्चेत आहे. पण ट्रेलरमधील एक पात्र मात्र लोकांच्या अधिक स्मरणात राहलंय. या अनोख्या पात्रानं प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे आणि ते साकारणाऱ्या अभिनेत्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
'पुष्पा: द रुल' मधील अर्ध टक्कल पात्र (Etv Bharat) तर हे अर्धवट टक्कल असलेल्या व्यक्तीचं पात्र साकरलं आहे अभिनेता तारक पोनप्पा यानं. तो कन्नड टेलिव्हिजनवरील एक परिचित चेहरा आहे. यापूर्वी त्यानं 'केजीएफ', 'कन्नड दर्शोल', 'गिल्की' आणि 'अमृता अपार्टमेंट' यांसारख्या लोकप्रिय शो आणि चित्रपटांमध्ये काम करुन आपली ओळख निर्माण केली आहे. परंतु 'पुष्पा: द रुल' या पॅन इंडिया चित्रपटामुळं त्याला आता देशभर ओळख मिळाली आहे.
अभिनेता तारक पोनप्पा (Etv Bharat) ईटीव्ही भारतला दिलेल्या एका मुलाखतीत, पोनप्पाने 'पुष्पा 2' च्या सेटवरील त्याच्या भूमिकेबद्दल आणि अनुभवाबद्दल आपलं मत व्यक्त केलं. त्यानं सांगितलं की, 7 जानेवारी रोजी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली, सुरुवातीला त्याच्या पात्राच्या विशिष्ट अर्ध्या मुंडणाचा भागाचा समावेश असलेल्या 'फेअर सीक्वेन्स'वर लक्ष केंद्रित केले. दररोज दोन ते तीन तास त्याला या व्यक्तिरेखेच्या मेकअपसाठी वेळ द्यावा लागला. परंतु हा त्याच्यासाठी एक आव्हानात्मक पण फायद्याचा अनुभव होता.
दिग्दर्शक सुकुमार यांच्याबरोबर काम करत असताना त्यांच्या सर्जनशीलतेची आणि दृष्टीची प्रशंसा केली आणि हा एक चांगला शिकण्याचा अनुभव असल्याचं सांगितलं. चित्रपटाचा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुनची व्यावसायिकता आणि समर्पण याचं कौतुक केलं.
अभिनेता तारक पोनप्पा याचा फिल्म इंडस्ट्रीतील उदय सोपा नव्हता. चित्रपटात अपयशाचाही अनुभव घेतलेल्या त्याच्यासारख्या कलाकाराला सुरुवातीला खूप अडथळ्यांचा सामना करावा लागला. मात्र 'केजीएफ' चित्रपटातील त्याच्या भूमिकेचं कौतुक झाल्यानं त्याच्यासाठी 'पुष्पा 2' मधील भूमिकेसह इतर मोठ्या प्रकल्पांचे दरवाजे उघडले. सुरुवातीला त्याच्या सिनेमातील कारकिर्दीबद्दल साशंक असलेल्या त्याच्या पालकांना आता त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटू लागला आहे.