नवी दिल्ली - Gurucharan Singh Missing : चार दिवसांपासून बेपत्ता असलेला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोधी याच्या हरवल्याच्या घटनेला विचीत्र वळण मिळालं आहे. त्याच्या गायब होण्य्याच्या बातमीनंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या मालिकेमध्ये रोशन सिंग सोधी या भूमिकेसाठी ओळखला जाणारा ५० वर्षीय अभिनेता गुरुचरण 22 एप्रिलपासून बेपत्ता आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी विमानात निघालेले असताना तो मुंबईत पोहोचलेच नसल्यामुळे खळबळ उडाली आहे.
एका बातमीनुसार गुरुचरण बेपत्ता झाल्याबद्दल त्याचे वडील हरगित सिंग यांनी दिल्लीच्या पालम पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. घरमालक वंश धारिवाल यांनी खुलासा केला की गुरुचरणचे आई-वडील गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीत राहत होते आणि अभिनेता गुरुचरण अनेकदा त्यांना भेटायला जायचा. मात्र, त्याची शेवटची भेट अचानक आटोपली आणि तो कोणताही मागमूस न लागता तो गायब झाला.
घरमालकाने सांगितले की, पोलीस गेल्या दोन दिवसांपासून सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, मात्र आतापर्यंत त्यांनी फक्त गुरुचरणने कोणते कपडे घातले होते ते तपासले आहे. "गेल्या दोन-तीन दिवसांपासून पोलीस येत आहेत, कॅमेरे तपासत आहेत, पण त्यांनी फक्त त्याने काय परिधान केले आहे ते पाहिले आणि इतर कोणताही मागमूस लागलेला नाही." असे घरमालक वंश धारिवाल यांनी सांगितलं.