महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Priyanka Chopra Visit ayodhya : देसी गर्ल प्रियांका चोप्रा पती निक जोनास आणि मुलगी मालतीबरोबर अयोध्येत ; व्हिडिओ व्हायरल - Priyanka Nick Jonas visit Ayodhya

Priyanka Chopra Visit ayodhya: देसी गर्ल प्रियांका चोप्रा पती निक जोनास आणि मुलगी मालतीबरोबर श्रीरामच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचली. आता तिचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Priyanka Chopra Visit ayodhya
प्रियांका चोप्रानं अयोध्येला भेट दिली

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 4:52 PM IST

मुंबई - Priyanka chopra and Nick jonas :हिंदी चित्रपटसृष्टीची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनास नुकतीच श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला पोहोचली. ती पती निक जोनास आणि मुलगी मालतीबरोबर मंदिरात दिसली. आता तिचे अयोध्येतील विमानतळावरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अयोध्येतील राम मंदिराला भेट देताना प्रियांकानं पिवळ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये ती सुंदर दिसत होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओत प्रियांकानं मालतीला आपल्या कडेवर धरले आहे. यावेळी निक देखील पारंपारिक लूकमध्ये दिसला. प्रियांका 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराच्या उद्घाटनाला हजर राहिली नव्हती.

प्रियांका चोप्रानं घेतले पती निक आणि मालतीबरोबर श्रीरामाचे दर्शन : विमानतळावर स्पॉट झाल्याचा व्हिडिओ आणि फोटोत प्रियांकाची आई डॉ. मधु चोप्राही दिसत आहे. याबरोबरच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 'जय श्री राम'च्या नारेही ऐकू येत आहेत. जानेवारीत झालेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विकी कौशल, कतरिना कैफ, रजनीकांत, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. प्रियांका आणि निक गेल्या काही दिवसांपासून भारतात आहेत. आता प्रियांका आपल्या पती आणि मुलीसह अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहे.

प्रियांका चोप्रा झळकली प्राईम व्हिडिओच्या कार्यक्रमात : प्रियांका गुरुवारी रात्री आपल्या मुलीसह मुंबईत पोहोचली. नंतर तिनं ईशा अंबानीनं आयोजित केलेल्या प्री-होळी पार्टीला हजेरी लावली. काही दिवसांनंतर, निक देखील भारतात पोहोचला, नुकतेच हे जोडपे रितेश सिधवानीच्या पार्टीत सहभागी होताना दिसले, ज्यामुळे अफवा पसरली की प्रियांका 'जी ले जरा'मध्ये दिसणार आहे. याशिवाय प्रियांका मंगळवारी प्राइम व्हिडिओच्या कार्यक्रमातही दिसली. या कार्यक्रमामधील प्रियांकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर यापुढं ती कल्पना चावला बायोपिकमध्ये दिसणार आहे. मात्र सध्या या चित्रपटाबाबत कुठली ही अपडेट आलेली नाही.

हेही वाचा :

  1. RC 16 pooja ceremony : राम चरण स्टारर 'आरसी 16'च्या मुहूर्ताला स्टार कास्टसह दिग्गज स्टार्सची उपस्थिती
  2. Ilaiyaraaja biopic : संगीतकार इलैयाराजा यांच्या बायोपिकची घोषणा, धनुष साकारणार संगीताच्या जादुई 'मॅस्ट्रो'ची भूमिका
  3. 'डॉन 3' चित्रपटासाठी चर्चेत असलेली शोभिता धुलिपालानं प्रियांका चोप्राबरोबरचा फोटो केला शेअर

ABOUT THE AUTHOR

...view details