महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

न्यूयॉर्कमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा मुलगी वामिकाबरोबरचा व्हिडिओ व्हायरल - Anushka Sharma and Virat Kohli - ANUSHKA SHARMA AND VIRAT KOHLI

Virat Kohli and Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली न्यूयॉर्क शहरात त्यांची मुलगी वामिकाबरोबर फॅमिली डे एन्जॉय करताना स्पॉट झाले. आत त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Virat Kohli and Anushka Sharma
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (Anushka Sharma and Virat Kohli's Sweet Family Moment with Daughter Vamika (Photo: ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 4:14 PM IST

मुंबई - Virat Kohli and Anushka Sharma :अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीचे चाहते मोठ्या संख्येनं आहेत. सध्या विराट आणि अनुष्का टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी न्यूयॉर्कमध्ये उपस्थित आहेत. विराट रविवारी पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघेही त्यांची मुलगी वामिकाबरोबर फिरताना दिसत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा गार्डन सिटी, न्यूयॉर्क येथे स्पॉट झाले. हा व्हिडिओ न्यूयॉर्कमधील हॉटेलमधील आहे. व्हिडिओत विराट आणि अनुष्का हात धरून वामिकाचा हॉटेलमध्ये जाताना दिसत आहे.

विराट आणि अनुष्काचा व्हिडिओ व्हायरल :आता विराट आणि अनुष्काचा हा व्हायरल व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट आणि अनुष्का हे कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहेत. अनेक चाहत्यांनी या जोडप्याचा व्हिडिओ अशा प्रकारे रेकॉर्ड करण्यावर आक्षेपही व्यक्त केला आहे. त्याच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती यूजर्सनं केली आहे. एका यूजर्सनं या पोस्टवर लिहिलं, "कृपया, त्याच्या गोपनीयतेचं उल्लंघन करू नका, ते देखील एक माणूस आहेत." दुसऱ्या युजरनं लिहिलं, "तुम्ही त्यांचा व्हिडिओ अशा प्रकारे रेकॉर्ड केला आहे, त्याच्या गोपनीयतेचा आदर करा." आणखी एका चाहत्यानं लिहिलं, "हा व्हिडिओ खूप सुंदर आहे." काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

'चकडा एक्सप्रेस'मध्ये अनुष्का दिसेल : या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर विराट सध्या त्याच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाबरोबर टी20 विश्वचषक 2024 मध्ये भाग घेत आहे. या विश्वचषकात भारतीय संघाला चार गट सामने खेळायचे आहेत, यामधील पहिल्या सामन्यात संघानं आयर्लंडचा आठ गडी राखून पराभव केला. दरम्यान, अनुष्का तिचा आगामी चित्रपट 'चकडा एक्सप्रेस'मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसेल. हा बायोपिक सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रोसित रॉय करत आहे.

हेही वाचा :

  1. 'मी अभिनेता होणे ही रामोजी रावांचीच कृपा', रितेश देशमुखचं विधान, तर "मार्गदर्शक गुरू हरपल्याचं" रजनीकांतचं ट्विट - Ramoji Rao Passes Away
  2. रामोजी राव खऱ्या अर्थानं भारतरत्न, सर्वोच्च उपाधी प्रदान करणे हीच त्यांना श्रद्धांजली - एस. एस. राजमौली - ramoji rao passed away
  3. सुधा चंद्रन, रितेश देशमुख ते भरत जाधव यांच्यापर्यंत दिग्गज स्टार्सना लॉन्च करणारे रामोजी राव - Ramoji Rao

ABOUT THE AUTHOR

...view details