मुंबई - Kalki 2898AD Trailer : अभिनेता प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी स्टारर 'कल्की 2898 एडी' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचे चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. आज 5 जून रोजी या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट या महिन्यात 27 जून रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. याआधी प्रभासच्या चाहत्यांना 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार यासाठी बातमी वाचा...
ट्रेलर कधी होईल रिलीज? : नाग अश्विनच्या दिग्दर्शनाखाली बनलेला, 'कल्की 2898 एडी' हा एक पौराणिक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये महाभारत ते इसवी सन 2898 पर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक साऊथ कलाकारांनी कॅमिओ केला आहे.'कल्की 2898 एडी' चित्रपटात अनेक सरप्राईज प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या चित्रपटाच्या ट्रेलरसाठी तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर 10 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर ट्रेलरची रिलीज तारीख जाहीर केली आहे.