मुंबई :'बिग बॉस 18'चा 'लाडला' विवियन डिसेनानं त्याला 'बिग बॉस'मधून मिळालेल्या टॅगबद्दल खुलासा केला आहे. शोच्या एपिसोडमध्ये, त्यानं ॲलिस कौशिकशी बोलताना म्हटलं की, त्याला लाडका का म्हटले जाते. टॅगबद्दल विवियननं सिद्धार्थ शुक्लाचं नाव न घेता म्हटलं, "तो खूप चांगला होता. इंडस्ट्रीतील दोनच व्यक्ती असे आहेत ज्यांच्याकडे निर्मात्यांसमोर बरोबर आणि चुकीचे म्हणण्याचे धैर्य होते." विवियनचे मत आहे की, कदाचित यामुळेच निर्माते त्याला शोचा 'लाडका' म्हणतात. या संवादामधून ॲलिस कौशिकला समजून घ्यायचे आहे की ती कुठे चुकत आहे. दरम्यान सिद्धार्थ 'बिग बॉस 13 चा विजेता होता.
टाइम गॉडसाठी नवीन टास्क :या आठवड्यात गुरुवारी 14 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये बीबी हाऊसला नवीन टाईम गॉड मिळाला. दरम्यान 'बिग बॉस 18'च्या नवीन टाईम गॉडसाठी एक नवीन टास्क सेट करण्यात आला होता. यात रजत दलाल, शिल्पा शिरोडकर आणि चाहत पांडे हे नव्या टाइम गॉडच्या शर्यतीत होते. घराचा टाइम गॉड बनण्यासाठी तिन्ही स्पर्धकांना चहा चोरावा लागला. तिघांपैकी कोणत्याही एकाला पाठिंबा देण्यासाठी, उर्वरित घरातील सदस्यांना दोन्ही स्पर्धकांच्या टोपलीतून चहा चोरून,त्यांच्या आवडत्या स्पर्धकाच्या टोपलीत टाकावा लागला. या टास्क दरम्यान, घरातील सदस्यांमध्ये बरीच बाचाबाची झाली, ज्यामध्ये अविनाश आणि दिग्विजय यांच्या जोरदार वाद झाले.