मुंबई: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या प्रसिद्ध शोचे लाखो चाहते आहेत. या शोमधील दया बेन या पात्राला खूप प्रसिद्धी मिळाली. अनेकांनी दिशा वकानीला शोमध्ये खूप पसंत केलं. दया बेनची व्यक्तिरेखा दिशा वकानी चांगली साकारू शकते, असे अनेक चाहत्यांचे म्हणणे आहेत. अनेकजण या शोमध्ये दया बेन म्हणजेच दिशाच्या पुनरागमनाची वाट पाहात आहेत. दया बेन अनेक वर्षांपासून शोमधून गायब आहे. वैयक्तिक आयुष्यात व्यग्र असल्यामुळे दिशा शोमध्ये परत येऊ शकली नाही. दया बेनची क्रेझ इतकी आहे की, निर्मात्यांनी या भूमिकेसाठी इतर कोणाला संपर्क देखील केला नाही. आता आम्ही आज तुम्हाला दया बेन पुनरागमन करणार की नाही याबद्दल सांगणार आहोत.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या निर्मात्यांनी केला खुलासा : दया बेनच्या पुनरागमनाबद्दल बोलताना शोच्या निर्माते असित मोदी यांनी म्हटलं, "आम्हाला दया बेनला पुन्हा शोमध्ये परत आणायचे आहे, कारण प्रेक्षकांसोबत आम्हाला देखील त्यांची आठवण येत आहे." यानंतर दया बेन पुनरागमन करणार की नाही, यावर असित मोदीनं सांगितलं, "मी अजूनही दिशा वकानीला शोमध्ये परत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आता तिच्यासाठी शोमध्ये येणे फार कठिण आहे. ती आता दोन मुलांची आई आहे. मी तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. आम्ही 17 वर्षे एकत्र काम केलंय. ती माझ्या बहिणीसारखी आहे, तिनं मला राखीही बांधली आहे. मात्र आता तिचं शोमध्ये येणं खूप कठिण आहे. आता काहीतरी चमत्कार घडला तर दिशा शोमध्ये परत येईल. तिची परत येणं शक्य नसेल तर दुसरी दया बेन शोमध्ये आणावी लागणार आहे."
दिशा वकानीनं घेतला होता ब्रेक : दिशा वकानीनं लग्नानंतर शोमधून ब्रेक घेतला होता. यानंतर ती शोमध्ये पुन्हा परत आली होती. तसेच तिनं पहिल्या मुलीला जन्म दिल्यानं ती पुन्हा एकदा ब्रेकवर गेली. यानंतर ती शोमध्ये परत येऊ शकली नाही. कोविडपूर्वी तिचे निर्मात्यांशी बोलणं सुरू होते. मात्र लाकडाऊननंतर तिनं दुसऱ्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर ती शोमध्ये परतली नाही. आता सर्वांची आवडली दया बेन बऱ्याच दिवसांपासून शोमध्ये परतली नाही, त्यामुळे प्रेक्षक खूप निराश झाले आहेत. आता दिशाची जागा भरण्यासाठी शोचे निर्माते दुसऱ्या दया बेनला शोधतील, असं सध्या दिसत आहे.