मुंबई Virat Kohli Anushka Sharma : 29 जून रोजी बार्बाडोस येथे भारतानं आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत 17 वर्षांचा विश्वचषकाचा दुष्काळ संपवला. भारतीय क्रिकेट संघाच्या या दमदार कामगिरीबद्दल देशवासियांकडून त्यांचं कौतुक होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी असलेल्या अनुष्का शर्मानेही भारताच्या विजयावर आनंद व्यक्त करत विराटचं कौतुक केल होतं. आता विराट कोहलीनं इंस्टाग्रामवर पत्नी अनुष्का शर्मासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
- भारतानं टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी विराटनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनुष्कासोबतचा एक फोटो पोस्ट केला. तिनं पोस्टमध्ये म्हटलं की, "तुझ्याशिवाय हे काहीही शक्य झालं नसतं...माझ्या प्रिये! तू मला नेहमी नम्र ठेवतेस. हा विजय जितका माझा आहे तितकाच तुझाही आहे. मी खूप धन्य आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तसेच मी तुझा खूप आभारीही आहे."
अनुष्काची इंस्टाग्राम पोस्ट :भारतानं दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकल्यावर बॉलिवूड अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्मानंही पोस्ट शेअर करत टीम इंडियाचं कौतुक केलं. तिनं विराटसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. "टी-20 विश्वचषक सामना संपल्यानंतर माहिकानं भारताला रडताना पाहिलं. "त्यांना तिथे धीर देण्यासाठी कोण असेल?" असा प्रश्न तिनं मला विचारला. मी तिला हो डार्लिंग असं म्हणाले. भारताने मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. चॅम्पियन्स... अभिनंदन !" अशी पोस्ट अनुष्कानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे.