महाराष्ट्र

maharashtra

विराट कोहलीनं व्हिडिओ कॉल करून अनुष्का शर्माला हरिकेन बेरीलची दाखवली झलक - virat showed anushka hurricane

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 3:47 PM IST

Virat Kohli video calls Anushka : अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विराटनं व्हिडिओ कॉलवर अनुष्काला बेरील वादळ दाखवलं आहे. आता यानंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Virat Kohli video calls Anushka
विराट कोहलीनं अनुष्काला व्हिडिओ कॉल केला (विराट कोहली-अनुष्का शर्मा (IANS))

मुंबई - Virat Kohli video calls Anushka :बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा स्टार फलंदाज पती विराट कोहली हे लोकांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. हे जोडपे अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. दोघांमधील नातं खूप घट्ट असून हे जोडपे एकमेकांपासून दूर असल्यावर फोनवर बोलून आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. विराट कोहली कितीही व्यग्र असला तरी तो नेहमी पत्नी अनुष्काशी बोलण्यासाठी वेळ काढतो. विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात तो व्हिडिओ कॉलवर अनुष्काला हरिकेन बेरील चक्रीवादळाचे भयानक दृश्य दाखवताना दिसत आहे.

व्हिडिओ कॉलवर बेरील वादळाचंदृश्य:टी 20 विश्वचषक फायनल जिंकल्यानंतर टीम इंडिया, दुसऱ्या दिवशी भारतात परतणार होती. मात्र विजयानंतर अवघ्या काही तासांतच बेरील वादळानं बार्बाडोसला धडक दिली. आता संपूर्ण टीम हॉटेल हिल्टनमध्ये अडकली आहे. यामध्ये विराट कोहलीचाही समावेश आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली रिसॉर्टच्या बाल्कनीत उभा राहून अनुष्का शर्माला व्हिडिओ कॉल करत आहे. तो तिला उंच लाटा आणि जोरदार वारा दाखवत असल्याचं दिसत आहे. एका बाजूनं बेरील वादळाचं दृश्य दाखवल्यानंतर तो बाल्कनीच्या दुसऱ्या बाजूलाही जातो. या जोरदार वादळात तो आपली टोपी धरून असल्याचा दिसत आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची प्रेमकहाणी :अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची प्रेमकहाणी एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान सुरू झाली होती. या जोडप्यानं 6 वर्षे एकमेकांना डेट केलं. 11 डिसेंबर 2017 रोजी या जोडप्याचं इटलीतील टस्कनी येथील व्हिला बोर्गो फिनोचिएटो येथे लग्न केलं. लग्नानंतर दोघेही अकाय आणि वामिकाचे पालक आहेत. तसंच अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. यापूर्वी 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'सुई धागा'मध्ये ती दिसली होती. यानंतर ती 'काला'मध्ये छोट्या भूमिकेत होती. हा चित्रपट अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत तयार करण्यात आला होता.

हेही वाचा :

  1. नीट परीक्षेवरील लोकांचा विश्वास उडाला- अभिनेता थलपतीनं केंद्र सरकारला 'ही' केली विनंती - ACTOR VIJAY on NEET
  2. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाबाबत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, "जे लग्नाच्याबाबत आनंदी.." - SHATRUGHAN SINHA
  3. रणवीर सिंगनं कुटुंबासहित पाहिला 'कल्की 2898 एडी', पत्नी दीपिकाकरिता शेअर केली पोस्ट - ranveer singh and deepika padukone

ABOUT THE AUTHOR

...view details