महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

विक्रांत मॅसी स्टारर 'ब्लॅकआउट' टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ... - Vikrant massey and mouni roy - VIKRANT MASSEY AND MOUNI ROY

Blackout Teaser Out: 'ट्वेल्थ फेल'च्या यशानंतर विक्रांत मॅसी त्याच्या पुढच्या प्रोजेक्ट 'ब्लॅकआउट'साठी सज्ज झाला आहे. आज 21 मे रोजी निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे.

Blackout Teaser Out
ब्लॅकआउट टीझर रिलीज ('ब्लैकआउट' का टीजर (@JioStudios You tube))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 21, 2024, 2:05 PM IST

मुंबई - Blackout Teaser Out :जिओ स्टुडिओने विक्रांत मॅसीचा आगामी चित्रपट 'ब्लॅकआउट'चा टीझर प्रदर्शित केला आहे. देवांग शशिन भावसार दिग्दर्शित, 'ब्लॅकआउट' 7 जून 2024 रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. 'ब्लॅकआऊट'च्या टीझरची सुरुवात रात्रीच्या रिकाम्या रस्त्यावर झालेल्या कार अपघातानं होते. विक्रांत मॅसी एका कारमध्ये आहे. तो रस्ता अपघातामुळे हैराण आणि घाबरला आहे. यानंतर तो सोन्यानं आणि पैशांनी भरलेली कार पाहून खूश होतो. मौल्यवान सामान पाहून तो तेथून पळून जाण्याचा निर्णय घेतो. त्याचे आयुष्य इतक्या लवकर बदलणार याबद्दल त्यानं कल्पनादेखील केली नसते.

'ब्लॅकआउट'चा टीझर प्रदर्शित :याशिवाय 'ब्लॅकआउट'चा टीझर अनिल कपूरनं त्याच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला आहे. या चित्रपटाचा टीझर हा अनेकांना आवडत आहे. या चित्रपटामध्ये विक्रांत मॅसी व्यतिरिक्त सुनील ग्रोव्हर, मौनी रॉय, जिशू सेनगुप्ता यांसारखे कलाकार आहेत. टीझरच्या पार्श्वभूमीवर अनिल कपूरचा आवाज ऐकू येतो. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि मराठी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनिल कपूरनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'ब्लॅकआऊट' टीझर शेअर करत लिहिलं, "काळ बदलणार आहे. 'ब्लॅकआऊट' होणार आहे." या चित्रपटात सस्पेन्स, थ्रिलर आणि कॉमेडी पाहायला मिळणार आहे. सध्या विक्रांत त्याच्या आगामी 'ब्लॅकआऊट' चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे.

विक्रांतचे आगामी चित्रपट :विक्रांत मॅसी शेवटी 'ट्वेल्थ फेल' या चित्रपटात दिसला होता. यामध्ये त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. 'ब्लॅकआउट' चित्रपटानंतर विक्रांत 'द साबरमती रिपोर्ट'मध्ये दिसणार आहे. 'द साबरमती रिपोर्ट' हा एक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाची कहाणी 2002 च्या गोध्रा ट्रेन घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट 2 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विक्रांतशिवाय राशि खन्ना आणि रिद्धी डोगरा दिसणार आहेत. 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचं दिग्दर्शन रंजन चांडेल यांनी केली आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरच्या प्रोडक्शन हाऊस बालाजी टेलिफिल्म्सद्वारे करण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. करण जोहरबरोबर काम करण्यासाठी टायगर श्रॉफ सज्ज, लवकरच आगामी चित्रपटाची घोषणा होणार - Tiger Shroff and KARAN JOHAR
  2. अभिनेता सलमान खाननं बजावला मतदानाचा हक्क; नदीम खान आणि सलमान खानची मतदान केंद्रावर झाली भेट - Lok Sabha Elections 2024
  3. जूनियर एनटीआर आणि प्रशांत नील 'ड्रॅगन' चित्रपटात करणार एकत्र काम - Jr NTR Next Film is Dragon

ABOUT THE AUTHOR

...view details