मुंबई - Vijay Deverakonda : साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याच्या चित्रपटांबरोबर त्याच्या कथित प्रेमसंबंधांमुळेही चर्चेत असतो. विजय सध्या त्याच्या आगामी 'द फॅमिली स्टार्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात सध्या व्यग्र आहे. 'द फॅमिली स्टार' 5 एप्रिल रोजी जगभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'द फॅमिली स्टार'च्या प्रमोशनदरम्यान त्यानं असं काही म्हटलं की, ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विजय देवरकोंडाच्या चाहत्यांना हे चांगलेच ठाऊक आहे की तो अभिनेत्री रश्मिका मंदान्ना डेट करत आहे.
विजय देवरकोंडा कधी करणार लग्न :या जोडप्यानं त्यांचं नात आतापर्यत जगासमोर कबूल केलेले नाही. मात्र अनेकदा हे जोडपे एकत्र दिसले आहेत. दरम्यान 'द फॅमिली स्टार' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विजयनं त्याच्या लग्नाबद्दल आणि कुटुंब वाढवण्याबाबत विधान केलं आहे. जेव्हा त्याला एका पत्रकारानं विचारले की, तू 2024मध्ये लग्न करण्याचं प्लानिंग करत आहे. यावर त्यानं म्हटलं, "आता 2024मध्ये नाही पण काही दिवसांनी लग्न नक्की करेल. मला पण वाटतं की, माझ लग्न व्हावं आणि मुले व्हावीत. यानंतर तो हसतो आणि पुढं म्हणतो की लव्ह मॅरेज करेल पण माझ्या निवडीला कुटुंबानं सहमती देणे महत्त्वाचे आहे.'' त्याचा लग्नाबाबत बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.