मुंबई - Vignesh shivan Post: साऊथ अभिनेत्री सुपरस्टार नयनतारा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिचे वैवाहिक जीवन विस्कटल्याचा दावा केला जात होता. नयनतारानं पती विघ्नेश शिवनला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं वृत्त समोर आलं होत. यानंतर या बातम्यांना आणखी हवा मिळू लागली. मात्र आता या जोडप्यानं या दाव्याचं खंडन केलं आहे. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान विघ्नेशनं आपल्या पत्नीबरोबरचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करून सर्वांना एक सुखद धक्का दिला आहे. या व्हिडिओत नयनतारा आणि विघ्नेश बसून बासरी वादनाचा आनंद घेताना दिसत आहेत. यामध्ये दोघेही एकत्र खूप खूश असल्याचं दिसत आहेत. आता विघ्नेश शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून या जोडप्याला एकत्र राहण्याचा सल्ला चाहते देताना दिसत आहेत.
नयनतारानं केलं विघ्नेश शिवनला फॉलो: आता पुन्हा एकदा बातम्या समोर येत आहे की, नयनतारानं आपल्या पतीला पुन्हा एकदा फॉलो करण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी नयनतारानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये असं लिहिलं होतं की, ''मी नेहमीचं डोळ्यात अश्रू आणत म्हणत असे की मला जे पाहिजे होतं ते मिळालं.'' यानंतर अनेकजण नयनतारा आणि विघ्नेशमध्ये काही ठिक नसल्याचा अंदाज लावू लागले होते. मात्र या जोडप्यामध्ये सर्व काही ठिक असल्याचं समजत आहे.