मुंबई- अॅक्शन स्टार विद्युत जामवालची मुख्य भूमिका असलेल्या 'क्रॅक' चित्रपटाच्या गाण्यांना आणि ट्रेलरला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला. विद्युतने आपल्या परफॉर्मन्समध्ये मोठा सकारात्मक बदल केल्याचे जाणावत असल्याने त्याचे प्रतिबिंब पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस ओपनिंगवर पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याचा चाहतावर्ग थिएटरबाहेर रांगा लावताना दिसल्याने आदित्य दत्त दिग्दर्शित 'क्रॅक: जीतेगा... तो जियेगा' चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या संकलनास मदत होईल असे दिसते.
'क्रॅक' चित्रपटाचा दमदार ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे निर्मात्यांनी विद्युत जामवालच्या या चित्रपटासाठी वितरणाचे मोठे लक्ष्य समोर ठेवले आहे. 'क्रॅक'च्या अॅडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या आठवड्यात रिलीज झालेल्या 'आर्टिकल 370' नंतरचा 'क्रॅक' हा दुसरा मोठा लोकप्रिय हिंदी चित्रपट आहे.
प्रीसेलच्या सर्व्हेनुसार विद्युत जामवालच्या या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर अपील असल्यामुळे दिवसभर चांगला वॉक-अप मिळेल असे गृहीत धरून, 'क्रॅक' 2-3 कोटी रुपयांच्या दरम्यान भारतात कलेक्शन करेल अशी अपेक्षा आहे. दिवसाचे तिकीट दर 99 रुपयापर्यंत मर्यादित असल्यामुळे आणि 750 हून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाल्यामुळे 'क्रॅक' आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.