मुंबई - Vidya Balan and Kartik Aaryan: 'भुल भुलैया 3'मध्ये अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता कार्तिक आर्यनचे चाहते दोघांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दोन्ही स्टार्स बुधवारी म्हणजेच 17 एप्रिल रोजी रात्री एकत्र दिसले. मुंबईत 'दो और दो प्यार'च्या स्क्रिनिंगदरम्यान दोन्ही कलाकार आपल्या स्टाईलिश अंदाजात दिसले. यादरम्यान दोघेही एकमेकांबरोबर धमाल करताना कॅमेऱ्यात कैद झाले. आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार्तिक विद्या बालनचे कौतुक करताना दिसत आहे. व्हिडिओत कार्तिक हा विद्याला म्हणतो, 'तू छान दिसत आहेस.' स्तुती केल्यानंतर विद्या प्रेमानं कार्तिकचा गाल ओढते. यानंतर दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि गमतीशीर संवादही साधला.
विद्याला करायची आहे कॉमेडी : 'भूल भुलैया' फ्रँचायझीमध्ये विद्याच्या पुनरागमनाच्या घोषणेनं चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 'भूल भुलैया 3'मध्ये तृप्ती दिमरीबरोबर कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटामध्ये विद्या असल्यामुळे चाहते 'भूल भुलैया 3'च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. विद्यानं 'भूल भुलैया 3' मधील तिच्या सहभागाबद्दल सांगताना म्हटलं की, 'एक अभिनेत्री म्हणून मला असे वाटते की मला कॉमेडी करण्याची संधी मिळाली नाही आणि मला कॉमेडी करण्याची तळमळ आहे. यावर मी आता नेहमीपेक्षा जास्त विचार करते. मी आत्तापर्यंत सगळ्याच चित्रपट एन्जॉय केला आहेत, पण आता मला वाटते की मला हसायचं आहे. काही दिवसांसाठी, थोड्या काळासाठी, काही वर्षांसाठी.'