मुंबई Vidya Balan Fake Instagram Account : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या नावे बनावट इंस्टाग्राम अकाऊंट बनवून, लोकांकडून पैसे उकळल्याची घटना घडलीय. अभिनेत्री विद्या बालननं फसवणूक करणाऱ्या तसेच बनावट नोकरी ऑफर करणाऱ्या अज्ञात व्यक्ती विरुद्ध खार पोलीस ठाण्यात (Khar Police Station) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आपल्या नावाचा गुन्हेगारी कृत्यांसाठी वापर केल्याचा आरोप विद्या बालननं केलाय. अज्ञात आरोपीनं विद्या बालनच्या नावे बनावट इंस्टाग्राम अकाऊंट आणि जी मेल अकाऊंट तयार केलं होतं.
काय आहे नेमकं प्रकरण?: खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या बालन ही पती सिद्धार्थ कपूरसोबत वांद्रे पश्चिम येथील एका अपार्टमेंटमध्ये राहते. 16 जानेवारी रोजी तिला स्टायलिश प्रणयला या चित्रपट उद्योगातील तिच्या ओळखीच्या व्यक्तीनं कळवलं की, त्याला एका नंबरवरून व्हॉट्सॲपवर मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये विद्या बालन असल्याचा दावा केला होता आणि चर्चेनंतर त्याला नोकरी ऑफर करण्यात आली होती. त्यावेळी विद्या बालननं स्टायलिश प्रणयला हा तिचा नंबर नसल्याची खातरजमा केली.
या प्रकरणाबाबत विद्या बालनच्या व्यवस्थापकानं तक्रार दिली होती. त्याआधारे माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (सी) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवलाय. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत - मोहन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खार पोलीस ठाणे
सोशल मीडिया फेक अकाउंट : विद्या बालनच्या प्रसिद्धीचा गैरवापर कोणीतरी करत असल्याचं लक्षात आल्यानं अभिनेत्री विद्या बालननं खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. फसवणूक करणारा गुन्हेगारी कृत्यांसाठी चित्रपट उद्योगातील व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी विद्या बालनच्या नावानं फेक सोशल मीडिया अकाउंटद्वारे अनेकांना संपर्क साधत असल्याचं उघडकीस आलं. 17 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान, चित्रपट उद्योगातील काहीजणांनी त्यांना (बालन) माहिती दिली की, फसवणूक करणाऱ्यानं बनावट Instagram अकाऊंट (vidya.balan.pvt) आणि बनावट G mail अकाऊंट (vidyabalanspeaks@gmail.com) या नावानं तयार केलंय. "विद्या बालन आहे" असं भासवून फसवणूक करणाऱ्यानं चित्रपटसृष्टीतील आणि इतर लोकांशी संपर्क साधला आणि नोकरीच्या खोट्या संधी दिल्या होत्या.
व्यवस्थापक विरुद्ध तक्रार दाखल : या प्रकरणी 20 जानेवारी रोजी विद्या बालनची व्यवस्थापक अदिती संधू यांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी खार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (सी) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवलाय याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन माने यांनी दिलीय.
हेही वाचा -
- Vidya Balan breaks silence : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्या बालनने 'मुलगी' असल्याच्या दाव्यावर सोडले मौन
- रणवीरच्या न्यूड फोटोवर विद्या बालन म्हणाली, ''हमें भी आँखे शेकने दो''
- 'स्कॅम १९९२' स्टार प्रतीक गांधीसोबत चित्रपटात रोमान्स करणार विद्या बालन