मुंबई Vicky Kaushal Youngest Fan : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'बॅड न्यूज' चित्रपट हा जुलैमध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'तौबा-तौबा' हे गाणं प्रचंड गाजलं होतं. यावर अनेकांनी रिल्स बनवून आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केल्या होत्या. हे गाणं आजही ट्रेंडमध्ये आहे. नुकताच या गाण्यावरील सोशल मीडियावर एका चिमुरडीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती 'तौबा-तौबा' म्हणताना दिसत आहे. या व्हिडिओनं सोशल मीडिया यूजर्सची मनं जिंकली आहेत. आता या व्हिडिओवर विकी कौशलनं देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. विकी कौशलच्या सर्वात यंगेस्ट फॅनला एक महिला विचारते, 'तुला कोणतं गाणं ऐकायला आवडेल?' यावर ती चिमुरडी गोड आवाजात 'तौबा-तौबा' म्हणते. या व्हिडिओमध्ये चिमुरडीचे असे काही क्षण दाखवण्यात आले आहेत, ज्यात ती बाललीला करत सहजपणे 'तौबा-तौबा' म्हणताना दिसत आहे.
विकी कौशलची यंगेस्ट फॅन : मुलीचा गोंडसपणा हा यूजर्संना आवडला आहे. याशिवाय तिचा क्यूटनेस पाहून विकी कौशलही स्वतःला प्रतिक्रिया देण्यापासून रोखू शकला नाही. 30 सप्टेंबर रोजी, विकीनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या यंगेस्ट फॅनचा व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये रेड हार्ट आणि इमोजीसह 'हे' लिहिलं. चिमुरडीचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ खूपच अप्रतिम आहे. अलीकडेच, विकीनं अबुधाबी येथे आयोजित आयफा 2024 ( IIFA 2024) अवॉर्ड्समध्ये शाहरुख खानसह कार्यक्रम होस्ट केला. 'किंग खान'बरोबर विकीनं प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.