मुंबई - Vicky Kaushal and Katrina kaif : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याचा नवीन चित्रपट 'बॅड न्यूज'च्या यशाचा आनंद घेत आहे. हा चित्रपट 19 जुलै रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं 4 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 33.2 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये कमी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता देखील विकी कौशल 'बॅड न्यूज'चं प्रमोशन करत आहे. अलीकडेच विकी कौशलला पत्नी कतरिनाबरोबर चित्रपट करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यानं एक उत्तर दिलं. आता या गोष्टीमुळे विकी हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
विकी आणि कतरिना दिसणार एका चित्रपटात एकत्र ? :विकी आणि कतरिनाला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळावे, अशी अनेक दिवसांपासून चाहत्यांची अपेक्षा आहे. दरम्यान विकी कौशलनं कतरिनाबरोबर काम करण्याबाबत म्हटलं, "मला आशा आहे की मी आणि कतरिना लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. आम्ही दोघंही आम्हाला योग्य प्रकारे शोभेल अशा कहाणीच्या शोधात आहोत. आम्हाला असा चित्रपट करायचा नाही जो फक्त आमच्यासाठी बनवला जाईल. कहाणीच्या मागणीनुसार आमची जोडी असावी, तरच मजा येईल. आम्ही वाट पाहत आहोत आणि आम्हाला याची घाई नाही." 'बॅड न्यूज'मधील विकीचा अभिनय अनेकांना आवडत आहे.