मुंबई- Superstar Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत मोस्ट अवेटेड चित्रपट 'वेट्टय्यान'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची बऱ्याचं दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. 'वेट्टय्यान'मध्ये रजनीकांत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर रजनीकांतचा एक बीटीएस व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रजनीकांत हा 'वेट्टयान'च्या डबिंग सेशनमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा नेहमीप्रमाणेच स्वॅग पाहायला मिळाला. रजनीकांतबरोबर या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, फहाद फासिल, राणा दग्गुबती, मंजू वॉरियर यांच्या देखील भूमिका आहेत.
रजनीकांतचा डबिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल :व्हिडिओमध्ये, रजनीकांत हा कॅज्युअल लूकमध्ये दिसला. डबिंग सत्रासाठी त्यानं पांढरा कुर्ता आणि लुंगी परिधान केली होती. पडद्यामागील व्हिडिओत, रजनीकांत त्याच्या कारमध्ये डबिंगसाठी स्टुडिओमध्ये जाताना दिसला, यानंतर तो 'वेट्टय्यान'ची टीम आणि दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांना भेटला. निर्मात्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रजनीकांत त्यांच्या चित्रपटाचे डायलॉग बोलताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे - 'सुपरस्टार रजनीकांत डबिंग सत्रात. 10 ऑक्टोबरला वेट्टय्यान हा चित्रपट तामिळ, तेलुगू, हिंदी आणि कन्नड भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.' आता अनेकजण या पोस्टवर चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात असल्याचं म्हणताना दिसत आहेत.