नवी दिल्ली :दिग्गज फॅशन डिझायनर रोहित बल यांचं निधन झालंय. त्यांनी 1 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडियाच्या (FDCI) अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या निधनाची बातमी शेअर करण्यात आलीय.
"आम्ही दिग्गज डिझायनर रोहित बल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. ते फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया (FDCI) चे संस्थापक सदस्य होते. आधुनिक संवेदनांसह पारंपरिक नमुन्यांच्या अद्वितीय मिश्रणासाठी ओळखले जाणारे, बल यांच्या कार्याने भारतीय फॅशनची नव्यानं व्याख्या केली आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा दिली. त्यांच्या कलात्मकतेचा वारसा, आणि नवनिर्मिती सोबतच फॅशनच्या जगात शांततेत राहतील, असं पोस्टमध्ये लिहिलं आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये, बाल तब्येतीच्या तक्रीरीमुळे जवळजवळ एक वर्षाने फॅशन जगतात परतले होते. लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये त्यांनी "कायनात: अ ब्लूम इन द युनिव्हर्स" या नावानं वस्त्रांचं प्रदर्शन केलं. गेल्या अनेक दिवसांपासून बाल यांची प्रकृती ठीक नव्हती. 2023 मध्ये त्यांना हृदयविकारामुळे दिल्लीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आठवड्यांनंतर, बाल यांनी एक पोस्ट लिहिली होती त्यात त्यांनी सर्वांचे आभार मानले. "प्रिय मित्रांनो, कुटुंबीय आणि समर्थकांनो, माझ्या आजारपणात तुमचे प्रेम आणि प्रार्थनेने मला मनापासून आधार दिला. तुमचा पाठिंबा हा आशा आणि शक्तीचा किरण आहे, जो मला बरे होण्याच्या प्रवासात मदत करत आहे. मी बरा होत असताना, मला नेहमीच तुमची आठवण झाली. आमच्या बॉन्डची लवचिकता आणि आमची स्वप्ने.. आणि मी तुम्हाला खात्री देतो की, आमच्या व्हिजनवरचा तुमचा विश्वास हाच या आव्हानात्मक काळात माझा प्रकाश होण्यामागची प्रेरणा आहे आशा आणि धैर्याने पुढे जा," अशी ती पोस्ट होती.
बाल मृत्यूसमयी 63 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय फॅशन उद्योगात नक्कीच पोकळी निर्माण झाली आहे.