ETV Bharat / entertainment

गर्लफ्रेंडबरोबर रणवीर अलाहाबादियाला समुद्रात पोहणे पडला महागात, थोडक्यात बचावला - RANVEER ALLAHBADIA

यूट्यूबर रणवीर अलाहाबादियानं पोस्ट शेअर करून सांगितलं की, तो गोव्याच्या बीचवर पोहताना बुडणार होता. यानंतर त्याला एका आयपीएस अधिकाऱ्यानं मदत केली.

ranveer allahbadia
रणवीर अलाहाबादिया (रणवीर अलाहाबादिया (ANI/Canva))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 12 hours ago

मुंबई : यूट्यूबवर बीयरबाइसेप्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणवीर अलाहाबादियानं नुकताच खुलासा केला की, तो गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहताना बुडणार होता. त्यानं सोशल मीडियाच्या माध्यामातून याबद्दल माहिती दिली आहे. त्यानं काही सुंदर फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिलं, 'तुम्हा सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. गोव्यातील माझ्या आयुष्यातील हा सर्वात वेगळा ख्रिसमस आहे. हे कॅप्शन लिहिताना मला थोडे कमजोर झाल्यासारखे वाटत आहे. आम्ही आता पूर्णपणे ठीक आहोत, परंतु काल संध्याकाळी सुमारे 6:00 वाजता, माझ्या आणि गर्लफ्रेंडबरोबर काहीतरी विचित्र घडले. आम्हा दोघांनाही खुल्या समुद्रात पोहायला आवडते. मी लहानपणापासून हे करत आलो आहोत. पण काल ​​आम्ही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलो. माझ्याबरोबर यापूर्वीही असं घडलं आहे, पण मी कधीही माझ्या पार्टनरबरोबर गेलो नव्हतो.'

रणवीर अलाहाबादियाचा जीव होता धोक्यात : रणवीरनं पुढं लिहिलं, 'एकटे पोहणे सोपे आहे. एखाद्याला आपल्या बरोबर बाहेर काढणे खूप कठीण आहे. 5-10 मिनिटांच्या संघर्षानंतर, आम्ही मदतीसाठी हाक मारली आणि जवळच असलेल्या कुटुंबानं आम्हाला ताबडतोब वाचवले. आम्ही दोघे चांगले जलतरणपटू आहोत, पण निसर्ग नेहमीच तुमची परीक्षा घेतो. लाटेत डुंबल्यानंतर एका जोरदार लाटेनं आम्हा दोघांनाही चांगलाच धक्का दिला होता. आम्ही दोघेही पाण्यात बुडू असं आम्हाला वाटत होतं. एक वेळ अशी आली की मी खूप पाणी गिळाले होते आणि हळूहळू मी बेशुद्ध पडलो. मग मी मदतीसाठी ओरडलो. आम्हा दोघांना वाचवणासाठी एक आयपीएस अधिकारी आले. या आयपीएस अधिकारी आणि त्यांच्या पत्नीचे मनःपूर्वक आभार. या अनुभवानं आम्हाला खूप काही शिकवलं, आम्ही देवाचे आभार मानले आणि ते आमच्याबरोबर आहे. या एका घटनेनं माझा जीवन जगण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. हे सर्व क्षण मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करत आहेत, कारण मी माझ्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला सांगत असतो. आज मी खूप भावनिक आणि कृतज्ञ आहे.'

गोव्याची सुट्टी संस्मरणीय : याशिवाय त्यानं पुढं लिहिलं, काल संध्याकाळी, मी माझ्या भावाला ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेबद्दल सांगण्यासाठी फोन केला. त्यानं आमच्यासाठी प्रार्थना केली. गोव्याची सुट्टी माझ्यासाठी खूप संस्मरणीय होती. मला वाटते 2025 हे एक चांगले वर्ष असणार आहे. माझ्याकडून तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. जीवनासाठी देवाचे आभार.' रणवीरनं नेहमीच त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख गुप्त ठेवली आहे. यावेळी देखील त्यानं व्हेकेशनचे फोटो शेअर करताना त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा दाखवला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.