मुंबई - Baby John Postponed:अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री कीर्ती सुरेश स्टारर ॲक्शन-पॅक्ड थ्रिलर चित्रपट 'बेबी जॉन'च्या रिलीजची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या रिलीजमध्ये काही बदल करण्यात आल्यामुळे चाहत्यांना यासाठी थोडा अधिक संयम बाळगावा लागेल. हा चित्रपट 31 मे रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र 'बेबी जॉन'च्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शनचं काम पूर्ण होयचं आहे. 'बेबी जॉन' चित्रपटाचं शुटिंग अजून 10-12 दिवस बाकी आहे. हे शूटिंग एप्रिलच्या अखेरीस पूर्ण होऊ शकते. यामुळे हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होण्यासाठी वेळ लागेल.
'बेबी जॉन' करावी लागेल प्रतीक्षा :या चित्रपटाचे निर्माते जून किंवा जुलै 2024 मध्ये हा चित्रपट रिलीज करण्याचा विचार करत आहे. 'बेबी जॉन' चित्रपटाचे निर्मितीचे काम पूर्ण झाल्यावरच काही अधिकृत घोषणा केली जाईल. 'बेबी जॉन' या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्यामुळे प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन स्टारर बहुप्रतीक्षित सायन्स फिक्शन चित्रपट 'कल्की 2898 एडी' 31 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकतो. मात्र, सध्या याबद्दलची पुष्टी झालेली नाही. वरुण धवन स्टारर 'बेबी जॉन'ची निर्मिती अॅटली आणि प्रिया अॅटली यांच्या ए फॉर अॅपल स्टुडिओजनं केली आहे.