मुंबई - Varun dhawan and natasha dalal baby : अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी सोमवारी, 3 जून रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केलं आहे. घरात नवीन सदस्य आल्यानं संपूर्ण धवन-दलाल कुटुंब आनंदी झालं आहे. वडील बनल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच वरुण हॉस्पिटलबाहेर दिसला. यानंतर वरुण धनवला भेटायला आलेले वडील डेव्हिड धवन हे त्याचा निरोप घेताना दिसले. याशिवाय हसत हसत वरुणनं मुलीच्या आगमनाबद्दल अभिनंदन करणाऱ्या फोटोग्राफर्सना थम्ब्स अप केलं. डेव्हिड धवन आणि वरुणच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद स्पष्ट दिसत होता. बाळाच्या स्वागताची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी या जोडप्यावर अभिनंदनचा वर्षाव केला आहे. नताशानं मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला.
वरुण धवन आणि नताशा दलाल झाले पालक : या आनंदाच्या बातमीनंतर काही वेळातच धवन-दलाल कुटुंबातील काही सदस्य हॉस्पिटलच्या बाहेर दिसले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये डेव्हिड धवन कारमध्ये बसल्यानंतर पापाराझींनी त्याला घेरलं. फिल्ममेकर डेव्हिड धवन हे कारमध्ये जाताना पापाराझीबरोबर बोलताना दिसले. पापाराझीनी बातमीची पुष्टी करण्यासाठी त्यांना विचारलं. की, 'सर, मुलगी आहे का?' तर यावर त्यांनी हो म्हटलं. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये वरुण धवनची मेहुणी आणि आई देखील यावेळी हॉस्पिटलमधून घरी जाताना दिसल्या. या दोघीही बाळाला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या.