मुंबई- Varalaxmi Sarathkumar :साऊथचा सुपरहिरो चित्रपट 'हनु-मॅन'मध्ये तेजा सज्जाच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारन विवाहबंधनात अडकणार आहे. आता ती स्वतः तिच्या लग्नाच्या पत्रिका वितरित करत आहे. लग्नासाठी अनेक सुपरस्टार्सना आमंत्रित केल्यानंतर वरलक्ष्मीनं आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिच्या लग्नाची पत्रिका दिली आहे. मोदींना तिच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी ती आपल्या कुटुंबासह आणि होणाऱ्या पती निकोलस सचदेवबरोबर गेली होती. वरलक्ष्मी सरथकुमारनं पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर आता काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
वरलक्ष्मी सरथकुमारनं दिलं पीएम मोदींना लग्नाचं आमंत्रण : वरलक्ष्मीचे वडील आणि राजकारणी आर. सरथकुमार आणि आई राधिका सरथकुमारही यावेळी उपस्थित असल्याचं दिसले. वरलक्ष्मी सरथकुमारनं, पंतप्रधान मोदींबरोबरचे फोटो शेअर करत लिहिलं, "पंतप्रधानांना भेटणं हे आमचं भाग्य आहे, आम्ही त्यांना आमच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी आमंत्रित केलं आहे, तुमच्या विनम्रतेबद्दल आणि स्वागतासाठी धन्यवाद, तुमच्या व्यग्र वेळापत्रक असल्यानंतर देखील, तुम्ही आम्हाला वेळ दिला यासाठी धन्यवाद. ही भेट घडवून आणल्याबद्दल आई आणि बाबा तुमचा देखील धन्यवाद." वरलक्ष्मी सरथकुमार आणि निकोलस सचदेव यांच्या लग्नात अनेक व्हीआयपी सेलिब्रिटी पाहुणे हजर असणार असल्याचं समजत आहे.