मुंबई - Urvashi Rautela at Cannes Film Festival 2024 :कान फिल्म फेस्टिव्हल 2024 सुरू झाला आहे. हा सोहळा 24 मे पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला ही या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात सहभागी झाली होती. आता तिनं रेड कार्पेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अनोख्या अवतारात दिसत आहे. 14 मेपासून सुरू झालेल्या कान फिल्म फेस्टिव्हलध्ये उर्वशी रौतेलानं दीपिका पदुकोणच्या लूकची आठवण करून दिली. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं कान फिल्म फेस्टिव्हल 2018 मध्ये असाच गाऊन परिधान केला होता.
उर्वशी रौतेलाचा कान फिल्म फेस्टिव्हलमधील लूक :उर्वशी रौतेलाच्या कान फेस्टिव्हलच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिनं डीपनेक हाय स्लिट गुलाबी गाऊन घातला होता. याशिवाय तिनं डोक्यावर स्टोन जडलेला एक बॅन्ड परिधान केला , तर तिनं हातात अशाप्रकारचे ब्रेसलेट घातले होते. उर्वशीनं चेहऱ्यावर शार्प मेकअप केला होता आणि कानात लांब झुमकेही घातले होते. कान फिल्म फेस्टिव्हलबद्दल बोलायचं झालं तर, या सोहळ्यात जगभरातील स्टार्स सहभागी होत आहेत. दरवर्षी हा उत्सव फ्रान्समध्ये होतो, जिथे अनेक चित्रपटही दाखवले जातात. समारोप समारंभात विजेत्यांचीही घोषणा केली जाते. यावर्षी 22 चित्रपटांमध्ये शर्यत आहेत.