मुंबई - Urmila Matondkar: 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकरनं 3 मार्च 2016 रोजी काश्मिरी मुस्लिम मोहसीन अख्तर मीरबरोबर लग्न केलं होतं. लग्नानंतर उर्मिलाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं होतं. उर्मिलानं लग्नानंतर धर्मही बदलल्याची चर्चा होती. तिनं आपलं नाव बदलून मरियम अख्तर मीर ठेवल्याचं सांगण्यात येत होतं. यानंतर उर्मिलानं या सर्व चर्चा खोट्या असल्याचं एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं. आता लग्नाच्या 8 वर्षानंतर उर्मिला घटस्फोट घेणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर तिच्या चाहत्यांना एक धक्का बसला आहे.
'रंगीला गर्ल'नं घटस्फोटासाठी केला अर्ज दाखल, पती मोहसीन अख्तर मीरपासून होणार विभक्त ? - Urmila Matondkar Divorce - URMILA MATONDKAR DIVORCE
Urmila Matondkar: लग्नाच्या 8 वर्षांनंतर उर्मिला मातोंडकर आणि मोहसीन अख्तर मीर यांचा घटस्फोट होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Sep 25, 2024, 1:59 PM IST
|Updated : Sep 25, 2024, 2:28 PM IST
उर्मिला मातोंडकर घेणार घटस्फोट ? : उर्मिला मातोंडकरच्या लग्नाला फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा व्यतिरिक्त काही सेलेब्रिटीदेखील उपस्थित होते. उर्मिला मातोंडकरनं मोहसीनपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचं समोर आलं आहे. या दोघांनी आपले लग्न संपवण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोणत्या कारणामुळे घटस्फोटा अर्ज दाखल केला? याबाबत, अद्याप काहीही ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र लवकरच दोघेही एक निवेदन जारी करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एका वर्षापासून उर्मिलानं पतीबरोबर कोणतीही पोस्ट शेअर केलेला नाही. सोशल मीडियावर सक्रिय असूनही उर्मिलाच्या अकाऊंटवर मोहसीनसोबतचा एकही फोटो नाही.
कोण आहे मोहसीन अख्तर मीर ? : उर्मिलानं गेल्या वर्षी 29 जून 2023 रोजी पतीबरोबर शेवटचा फोटो पोस्ट केला होता. दरम्यान उर्मिला आणि मोहसीन यांच्या वयात 10 वर्षांचा फरक आहे. या दोघांची भेट डिझायनर मनीष मल्होत्रामुळं झाली होती. मनीष हा उर्मिला आणि मोहसीनचाही मित्र आहे. मोहसीन हा काश्मीरमधील एक बिझनेसमन आणि मॉडेल आहे. त्यानं चित्रपटसृष्टीत 'इट्स अ मॅन्स वर्ल्ड' या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होत. यानंतर त्यानं 'लक बाय चान्स' आणि 'बीए पास' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. दरम्यान उर्मिलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 2018 मध्ये रिलीज झालेल्या इरफान खानच्या 'ब्लॅकमेल' चित्रपटात दिसली होती.