महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

उर्फी जावेदची शाहरुख खानबरोबर सेल्फी व्हायरल, फोटो पाहून युजर्सना धक्का - Uorfi Javed selfie with SRK - UORFI JAVED SELFIE WITH SRK

Uorfi Javed selfie with SRK : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि वादग्रस्त कपड्यांमुळे कायम चर्चेत राहणारी उर्फी जावेदचा एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटो पाहिल्यानंतर नेटिझन्स सोशल मीडियावर वेगवेगळ्या धक्कादायक कमेंट करत आहेत.

Uorfi Javed selfie with SRK
उर्फी जावेद स्नॅपचॅट

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 1:27 PM IST

मुंबई - Uorfi Javed selfie with SRK : आजवर उर्फी जावेदनं परिधान केलेले वेगवेगळे ड्रेस आठवून पाहण्याचा प्रयत्न केलात तरी तुम्ही थक्क व्हाल. धारदार ब्लेड, गोनी, वायर, पॉलिथिन, दोरी, मोबाईल, धागे, कंगवे, रॅपर्स अशा सामान्य माणसाच्या उपयोगातील वस्तुंपासून डिझाईन केलेले ड्रेस घालून अर्धनग्न होऊन फिरणारी सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी उर्फी तिच्या विचित्र आणि वादग्रस्त कपड्यांमुळे चर्चेत आलेली नाही, तर तिनं तिच्या स्वप्नपूर्तीचा फोटो शेअर करुन चाहत्यांचे डोळे विस्फारले आहेत. उर्फीनं नेहमीच शाहरुख खानला भेटण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. तिचं हे स्वप्न अलिकडेच पूर्ण झालं आणि तिनं शाहरुच्या बरोबर एक सेल्फीही घेतला होता.

उर्फीचे स्वप्न सत्यात उतरलं?

उर्फी जावेदनं तिच्या इन्स्टा स्टोरीवर शाहरुख खानबरोबरचा एक सेल्फी फोटो पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे हा फोटो स्वतः शाहरुख खाननं क्लिक केला आहे. किंग खानबरोबरच्या उर्फीच्या फोटोनं मात्र सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हा सेल्फी व्हायरल होत चाललाय आणि लोकांचा यावर विश्वासच बसत नाही. हे कसं शक्य आहे, अशीच भावना नेटिझन्स व्यक्त करत आहेत.

उर्फीचा सेल्फी फोटो पाहून नेटिझन्सना धक्का

शाहरुख बरोबरचा सेल्फी पाहिल्यानंतर आपलेल्या प्रतिक्रिया मजेशीरही आहेत. त्यापैकी एकानं लिहिलंय, ''शाहरुख खानचा चेहरा असलेले कपडेही मार्केटमध्ये आलेत का?'' 'हा गोड फोटो आहे. एक चंद्र आहे आणि दुसरा त्या चंद्रावरचा डाग आहे.'', असं एका नेटिझन्सनं म्हटलंय. ''मस्करी करायचा प्रयत्न केला पण खरंच मी चांगले दिसतेय," अशी कॅप्शनही एकानं दिलीय. एका यूजरने लिहिले आहे की, ''ती खूप भाग्यवान आहे.'' एकजण लिहितो, ''शाहरुख खानची काय मजबुरी होती?''

उर्फी जावेद स्नॅपचॅट

या फोटोची सत्यता किती आहे?

शाहरुख खानसोबत उर्फीचा हा सेल्फी स्नॅपचॅटच्या फिल्टरचा एक चमत्कार आहे. यामध्ये तुम्ही कोणत्याही स्टारसोबत तुमचा फोटो तयार करू शकता. त्यामुळे या फोटोच्या सत्यतेबद्दल अनेक प्रश्न चिन्ह निर्माण करतात. उर्फी जावेद सध्या 'फॉलो कर लो यार' या प्राइम व्हिडिओवरील मालिकेमध्ये झळकली आहे. उर्फी एकता कपूरच्या 'लव्ह सेक्स और धोखा 2' मध्ये देखील दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा -

  1. Allu Arjun : अल्लू अर्जुननं इन्स्टाग्रामवर 25 दशलक्ष फॉलोअर्स झाल्यानंतर मानले चाहत्यांचे आभार - Allu Arjun
  2. Stri and Singham sequel : 'स्त्री'चा दुसरा आणि 'सिंघम'चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला!
  3. Baaghi 4 : टायगर श्रॉफ स्टारर 'बागी' फ्रेंचाइजीचा चौथा भाग येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ABOUT THE AUTHOR

...view details