महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

खासदार कंगना रनौत आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचं संसदेत 'पुनर्मिलन' !! - Kangana Ranaut and Chirag Paswan

Kangana Ranaut and Chirag Paswan : कंगना रणौत आणि चिराग पासवान यांची संसदेत पुन्हा भेट झाली आहे. दोघांनीही यांनी २०११ मध्ये एका चित्रपटात काम केलं होतं. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून अनेक चित्रपट कंगना यांनी गाजवले, अगदी राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली. तर चिराग यांनी तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येत केंद्रीय मंत्रिपद भूषवलं आहे. विशेष म्हणजे 41 वर्षाचे असलेले चिराग पासवान आणि 38 वर्षे वयाच्या कंगना रणौत हे दोघेही अविवाहित आहेत.

Kangana Ranaut and Chirag Paswan
कंगना रनौत आणि चिराग पासवान ((IANS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 11:42 AM IST

Updated : Jun 27, 2024, 12:42 PM IST

मुंबई - Kangana Ranaut and Chirag Paswan : केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि भाजप खासदार कंगना रणौत यांची संसदेच्या प्रवेशद्वारावर झालेली भेट आणि त्यांच्यात दिसून आलेली मैत्री यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चिराग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले असून फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज पोर्टफोलिओचे ते प्रभारी कॅबिनेट मंत्री आहेत. कंगना रणौत भाजपाच्या तिकीटावर मंडी लोकसभा मंतदार संघातून पहिल्यांदाच खासदार बनल्या आहेत. तरीही दोघांच्यात इतकी सलगी कशी असं जर कुणाला प्रश्न पडला असेल तर, दोघांच्यातील ओळख आणि मैत्री गेल्या 13 वर्षापूर्वी पासूनची आहे. दोघांनी 2011 मध्ये 'मिले ना मिले हम' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

चिराग यांचे दिवंगत वडील रामविलास पासवान हे बिहारमधील लोकप्रिय नेता होते. 9 वेळा लोकसभा निवडणूकीत विजय मिळवलेल्या पासवान यांनी आपला राजकीय वारसा चिराग यांना देऊन 'लोक जनशक्ती पार्टी' त्यांच्याकडं सोपवली आहे. आज बिहारमध्ये चिराग अतिशय लोकप्रिय नेता बनले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाबरोबर युती करुन विजय मिळवला. त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीनं 5 जागा लढवल्या आणि सर्वच जिंकुन सबंध देशाचं लक्ष वेधून घेतलं. बॉलिवूडच्या हिरोंनाही लाजवतील असं देखणं व्यक्तिमत्व चिराग यांना लाभलं आहे. खरंतर त्यांनी 'मिले ना मिले हम' चित्रपटातून हिरो म्हणून स्वतःला आजमवण्याचा प्रयत्न केला, परंतु पदरी अपयश आलं. मात्र या अपयशाची भरपाई त्यांनी राजकारणात केली. राजकारणात त्यांना घवघवीत यश मिळालं आहे.

'मिले ना मिले हम' या चित्रपटात चिराग आणि कंगनाची जोडी पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील अनेक गाण्यांमध्ये आणि सीन्समध्ये दोघांनी भरपूर रोमान्स केल्याचं तुम्हीही पाहू शकता. त्यामुळे दोघांमधील केमेस्ट्री अतिशय जुळणारी आहे आणि फिल्म इंडस्ट्रीतून दोघंही येत असल्यामुळे त्यांच्यात भेटतानाची सहजता पायला मिळते. तशी ती लोकसभेच्या प्रवेशद्वारावर पाहायला मिळाली.

कंगना रणौत या पहिल्यांदाच खासदार झाल्या आणि त्या हिमाचल प्रदेशातील मंडी येथून निवडून आल्या आहेत. त्यांनी या निवडणुकीत राज्यमंत्री आणि हेवीवेट उमेदवार विक्रमादित्य सिंग यांचा जवळपास 75,000 मतांच्या फरकानं पराभव केला. सिनेमाच्या आघाडीवर, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री कंगना आता त्यांच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाल्या आहेत. या चित्रपटात त्या इंदिरा गांधींची भूमिका साकारत असून या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलंय.

Last Updated : Jun 27, 2024, 12:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details