मुंबई- Rakesh Rsohan Fitness : चित्रपट निर्माते राकेश रोशन वयाच्या 74 व्या वर्षीही मजबूत आहेत. वयाचा फिटनेस आणि आरोग्यासाठी कोणताही अडथळा असत नाही हेच त्यांनी दाखवून दिलंय. त्यांचा मुलगा अभिनेता हृतिक रोशन स्वत: फिटनेस प्रेमी आहे. त्यानं त्याच्या सोशल मीडिया हँडलवर वडिल दैनंदिन जिममध्ये मोहनत करत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते दोरीवरच्या उड्या आणि काठी वापरून व्यायाम करतानाचा समावेश आहे.
इंस्टाग्राम स्टोरीवर हृतिक रोशनने त्याच्या वडिलांची वर्कआउट रील शेअर केली आणि लिहिले, "मतलब के कैसे!! अविश्वसनीय पापा!!" व्हिडिओमध्ये राकेश रोशनचे जिममधील जोरदार कसरत सेशन कॅप्चर करण्यात आले आहे. यामध्ये ते फिटनेस प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विविध व्यायाम करताना दिसतात. लाल शॉर्ट्ससह काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेले अनुभवी चित्रपट निर्माते राकेश रोशन आपली ताकद आणि चपळता दाखवताना दिसतात. त्यांच्या प्रभावी फिटनेसमुळे चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे.
राकेश रोशनचा फिटनेसचा प्रवास घशाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील स्क्वॅमस सेल कार्सिनोमाशी झालेल्या लढाईचा विचार करता आणखी प्रेरणादायी आहे. आरोग्याच्या आव्हानांना तोंड देत असूनही, राकेश रोशनची अजिंक्य भावना आणि निरोगी राहण्यासाठी समर्पण जीवनशैली अनेकांसाठी प्रेरक आहे.