मुंबई - Tumhare Hi Rahenge Hum From Stree 2 : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. अमर कौशिक दिग्दर्शित आगामी हॉरर-कॉमेडी ड्रामा पाहण्यासाठी आता अनेकजण उत्सुक आहेत. दरम्यान, चाहते आणि प्रेक्षकांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी निर्मात्यांनी 'स्त्री 2'मधील 'तुम्हारे ही रहेंगे हम' गाणं आज, 6 ऑगस्ट रोजी रिलीज केलं आहे. हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर लोकप्रिय झालं आहे. तसंच श्रद्धा आणि राजकुमार यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'स्त्री 2'च्या नवीन रोमँटिक गाण्याची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. हे गाणं शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "प्रतीक्षा संपली कारण आम्ही तुमचेच होतो, आम्ही तुमचेच आहोत, आम्ही तुमचेच राहू."
'स्त्री 2'मधील गाणं रिलीज :'स्त्री 2' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. रिलीज झालेल्या गाण्यामध्ये 'स्त्री' आणि 'बिक्की' यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री सुंदर पद्धतीनं मांडण्यात आली आहे. या गाण्यात स्त्रीच्या पहिल्या भागाची झलकही दाखवण्यात आली आहे. 'स्त्री 2'मधील गाणं वरुण जैन, शिल्पा राव आणि सचिन-जिगर यांनी गायलं आहे. या गाण्याचं संगीत सचिन-जिगर यांनी संगीत दिलंय. आता 'स्त्री 2 रिलीज होण्यासाठी फक्त 10 दिवस बाकी आहेत. या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव व्यतिरिक्त तमन्ना भाटिया, अपारशक्ति खुराना, विजय राज, आकाश दाभाडे, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि फ्लोरा सैनी हे कलाकार दिसणार आहेत.