मुंबई : 'भूल भुलैया 3' फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी तिच्या कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंटबरोबर फिनलंडला गेली आहे. येथील बर्फाळ दऱ्यांमधील तृप्ती आणि तिच्या कथित बॉयफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये तृप्ती बर्फामध्ये मस्ती करताना दिसत आहेत. तृप्ती आणि सॅम काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या कथित नात्याबद्दल उघडपणे काहीही सांगितलेलं नाहीत. 'भूल भुलैया 3'च्या यशानंतर तृप्ती डिमरी खूप खुश आहे. दरम्यान फिनलंडमधील तिचे फोटो आणि व्हिडिओ आता तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत.
तृप्ती डिमरीचे फोटो व्हायरल :तृप्ती डिमरीनं शेअर केलेल्या एका व्हिडिओच्या पोस्टवर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं तिच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, 'खूप सुंदर, स्नोफॉलमध्ये छान एंजॉय कर.' दुसऱ्या एकानं लिहिलं,'सर्दी होईल थोडा सांभाळून खेळ.' आणखी एकानं लिहिलं, 'वॉव खूप एंजॉय करत आहे, मला पण इथे जायचं आहे.' याशिवाय अनेकजण तृप्तीच्या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. सध्या तृप्ती आणि सॅम बर्फाळ दऱ्यांमध्ये मजा करत आहेत. फिनलंड आपल्या सौंदर्यासाठी आणि बर्फाच्छादित दऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या देशामध्ये अनेक पर्यटक दरवर्ष यावेळी जात असतात.
तृप्ती डिमरी (Tripti Dimri and sam merchant) तृप्ती डिमरी (Tripti Dimri and sam merchant) तृप्ती डिमरी (Tripti Dimri and sam merchant) तृप्ती डिमरी (Tripti Dimri and sam merchant) तृप्ती डिमरी (Tripti Dimri and sam merchant) तृप्ती डिमरी (Tripti Dimri and sam merchant) तृप्ती डिमरीचा कथित बॉयफ्रेंड :तसेच सॅम मर्चंटनं देखील त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तृप्ती आणि त्याच्या काही पोस्ट या सारख्या आहेत. दरम्यान सॅम मर्चंटबद्दल बोलायचं झालं तर तो एक मॉडेल आहे, ज्यानं 2022मध्ये ग्लॅडरॅग्स मॅनहंट स्पर्धा जिंकली. सॅम हा एक व्यापारी असून गोव्यातील कैसावार्टर्स आणि एव्योरे गोआ फर्म्सचा संस्थापक आहे. सॅम हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. दरम्यान तृप्तीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटामध्ये राजकुमार रावबरोबर दिसली होती. आता पुढं ती 'धडक 2' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :
- राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ'चं ट्रेलर रिलीज, हसा खळखळून - VVKWV trailer out
- चांगली बातमी 'बॅड न्यूज' ओटीटीवर रिलीज - Vicky Kaushal and Tripti Dimri
- दररोज नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे : तृप्ती डिमरी! - Tripti Dimri Exclusive Interview