महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

संजय जाधव दिग्दर्शित "ये रे ये रे पैसा ३" च्या शूटिंगला प्रारंभ! - Yeh Re Yeh Re Paisa 3 shooting - YEH RE YEH RE PAISA 3 SHOOTING

Yeh Re Yeh Re Paisa 3 : संजय जाधव दिग्दर्शित "ये रे ये रे पैसा" चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला मुंबईत सुरूवात झाली आहे.

Yeh Re Yeh Re Paisa 3
"ये रे ये रे पैसा ३" च्या शूटिंगला प्रारंभ! (Yeh Re Yeh Re Paisa 3 PR team)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 2:45 PM IST

मुंबई - Yeh Re Yeh Re Paisa 3 : 'ये रे ये रे पैसा' हा २०१८ साली प्रदर्शित झाला होता आणि त्याचा सिक्वेल २०१९ साली आला होता. झटपट पैसा मिळवण्यासाठीची धडपड आणि त्यातून होणारे गोंधळ या कथासूत्रावर हे चित्रपट बेतलेले होते. 'ये रे ये रे पैसा' च्या दोन्ही भागांना भरपूर प्रेक्षक आश्रय मिळाला होता. संजय जाधव दिग्दर्शित हे दोन्ही भाग मल्टीस्टारर होते. आता या चित्रपटाचा तिसरा भाग येऊ घातला आहे. 'ये रे ये रे पैसा ३' चेही दिग्दर्शन संजय जाधव करीत असून नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत सुरु झाले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.



संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे अशी तगडी स्टारकास्ट आणि अनेक दिग्गज कलाकार असलेल्या 'ये रे ये रे पैसा ३' मध्ये वनिता खरात, नागेश भोसले, जयवंत वाडकर यांची वर्णी लागली असून प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर पडेल असे संजय जाधव म्हणाला. या चित्रपटाचा मुहूर्त आमदार योगेश टिळेकर, निर्माते-दिग्दर्शक अभिजीत पानसे, मनसे नेते संदीप देशपांडे, निर्माते नानूभाई जयसिंघानी यांच्या हस्ते पार पडला आणि चित्रपटाच्या चित्रीकरणला मुंबई येथे सुरुवात करण्यात आली.



अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अ‍ॅरो या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून निर्माते आहेत सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ. तर निनाद नंदकुमार बत्तीन हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे, तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे.



'ये रे ये रे पैसा ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

हेही वाचा -

  1. 'कलावती' चित्रपटासाठी दिग्दर्शक संजय जाधव पुन्हा वळले सिनेमाटोग्राफीकेडे
  2. संजय जाधवची पहिली वेब सिरीज, सस्पेन्स थ्रिलर ‘अनुराधा’!
  3. संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' चित्रपटाचा टीझर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details