महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Stri and Singham : 'स्त्री'चा दुसरा आणि 'सिंघम'चा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला! - Stri and Singham sequel - STRI AND SINGHAM SEQUEL

Stri and Singham sequel : 'स्त्री' आणि 'सिंघम' चित्रपटांच्या सीक्वेलची खूप काळापासून प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. अखेर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी रिलीजची तारीख सांगून प्रेक्षकांना दिलासा दिला आहे. हे दोन्ही सीक्वेल चित्रपट यंदाच्या ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित केले जाणार आहेत.

Stri and Singham sequel
'स्त्री'चा दुसरा आणि 'सिंघम'चा तिसरा भाग

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 11:42 AM IST

Updated : Mar 21, 2024, 2:28 PM IST

मुंबई- Stri and Singham sequel : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'स्त्री' हा चित्रपट खूप गाजला होता. त्यातील 'ओ स्त्री तूम कल आना' हे वाक्यही खूप फेमस झाले होते. हल्लीच्या प्रघाताप्रमाणे या हिट चित्रपटाचा सिक्वेल येणे अपेक्षित आणि नक्की होते. निर्माता दिनेश विजन यांनी तशी घोषणाही केली होती. आता 'स्त्री २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतीच त्याची पहिली झलक प्रदर्शित करण्यात आली. या हॉरर कॉमेडीची प्रेक्षक वाट पाहत होते आणि त्यांची ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. 'स्त्री २' मध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्यासह अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी, विजय राज, आकाश दाभाडे, पंकज त्रिपाठी हेदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसतील. यात वरुण धवन 'भेडिया'च्या रूपात अवतरेल तर तमन्ना भाटिया एका गाण्यातून प्रेक्षकांना रिझवेल. 'स्त्री २' यावर्षी ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

'स्त्री'आणि 'सिंघम'चा सीक्वेल कन्फर्म



रोहित शेट्टी याने पोलिसांची प्रतिमा उंचावणारे सिनेमे दिले आहेत, त्यातील पहिला म्हणजे 'सिंघम' ज्यात अजय देवगणची शीर्षक भूमिका होती. या चित्रपटाला भरपूर यश मिळाले आणि रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांनी त्याचा सिक्वेल बनवला. त्या 'सिंघम रिटर्न्स' या सिनेमानेही घवघवीत यश मिळविले आणि रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा जन्म झाला. त्याने नंतर त्याअंतर्गत त्यानं रणवीर सिंग ला घेऊन 'सिम्बा' बनवला,ज्यात अजय देवगणचा कॅमीयो होता आणि शेवटाला अक्षय कुमारने 'सूर्यवंशी'ची झलक दिली होती. रोहित शेट्टीच्या अक्षय कुमार अभिनित 'सूर्यवंशी'ने चांगला धंदा केला. यात शेवटाला अक्षय सोबत अजय आणि रणवीरच्या एंट्रीने जबरदस्त धमाल केली होती.


आता रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स मधील पाचवा चित्रपट येऊ घातला आहे, ज्यात ओरिजिनल 'सिंघम' अजय देवगण प्रमुख भूमिकेत असेल. 'सिंघम' फ्रँचायझी मधील हा तिसरा चित्रपट असून यात जबरदस्त स्टारकास्ट आहे. अजय देवगण, करीना कपूर खान हे प्रमुख भूमिकेत तर टायगर श्रॉफ अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहे. यांच्याबरोबर अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण यांच्याही छोटेखानी भूमिका आहेत. तसेच अर्जुन कपूर एका खुंखार व्हिलनची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'सिघम अगेन' येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा -

  1. Pulkit and Kriti Kharbanda : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लग्नानंतर मुंबईला परतले, विमानतळावर केले मिठाई वाटप
  2. Baaghi 4 : टायगर श्रॉफ स्टारर 'बागी' फ्रेंचाइजीचा चौथा भाग येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
  3. Jyothika thanks Shaitan team : "शैतान हा एक प्रवास होता" म्हणत, ज्योतिकाने 'शैतान'च्या रीलसह मानले टीमचे आभार
Last Updated : Mar 21, 2024, 2:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details