महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

करण जोहर निर्मित रक्तरंजित अ‍ॅक्शन थ्रिलर 'किल' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित - करण जोहर

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा आगामी चित्रपट 'किल'च्या रिलीजची तारीख जाहीर झाली आहे. लक्ष्य लालवानी यामधून अभिनयात पदार्पण करत असून हा चित्रपट 5 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल.

Kill movie poster
'किल' चित्रपटाचे पोस्टर

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 2:10 PM IST

मुंबई- निर्माता करण जोहरने त्याच्या आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर 'किल' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटातून लक्ष्य लालवानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'किल'चा फर्स्ट लूक लॉन्च करताना करणने हा चित्रपट 5 जुलै 2024 रोजी प्रदर्शित होणार असल्याचंही जाहीर केलं आहे.

करणने इन्स्टाग्रामवर 'किल'चे पोस्टर पोस्ट केले. याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलंय, "रक्त. रक्त आणि रक्त.आम्ही तुम्हाला चित्रपटातील हा प्राणी दाखवत आहोत." भारतात 5 जुलै 2024 रोजी किल हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होईल, असंही करणने पुढे लिहिलंय. निखिल नागेश भट दिग्दर्शित, 'किल'चे अधिकृत पोस्टर खूपच आकर्षक दिसत आहे. यामध्ये लक्ष्य लालवानीला रेल्वेत बांधल्याचं दिसत असून त्याचा छळ सुरू असल्याचं दिसतंय. हा चित्रपट रक्तरंजित असणार याची झलक करण जोहरच्या कॅप्शन आणि किलच्या शीर्षकासह पोस्टरमधील लक्ष्यच्या लूकवरुन दिसत आहे.

शनाया कपूर आणि गुरफतेह पिरजादा यांच्यासोबत लक्ष्य 'बेधडक' या आगामी चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. शशांक खेतान दिग्दर्शित 'बेधडक' या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

टोरंटोचित्रपट महोत्सवात झाला 'किल'चा प्रीमियर -गेल्या वर्षी टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मिडनाईट मॅडनेस विभागात 'किल' या चित्रपटाचा प्रीमियर झाला. प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यासाठी निवडलेल्या दहा चित्रपटापैकी 'किल' एक होता. या चित्रपटाचं कौतुक करताना अनुराग कश्यप म्हणाला होता की, " हा एक अद्भूत चित्रपट आहे. किल हा आजवरचा सर्वात महान अ‍ॅक्शन चित्रपट आहे, यासारखा चित्रपट मी पूर्वी कधीच पाहिला नव्हता. धर्माचा चित्रपट आहे पण यात मोठे स्टार्स नसले तरी असा चित्रपट असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. या चित्रपटाला चित्रपट महोत्सवात मिळालेला प्रतिसादही वाखाणण्याजोगा होता."

चित्रपटातील कलाकार - या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये तान्या माणिकतला आणि राघव जुयाल यांचाही समावेश आहे. दिग्दर्शक निखिल नागेश भट्ट यांनी यापूर्वी सनी कौशल, विजय वर्मा आणि नुसरत भरुचा यांच्या भूमिका असलेल्या 'हुरदांग' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

लक्ष्य लालवानी यानेही आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर ही बातमी जाहीर केली. या यशाबद्दल त्याच्या इंडस्ट्रीतील मित्रांनी त्याचे अभिनंदन केलंय. जान्हवी कपूरने लिहिले, 'तुझ्यासाठी खूप उत्सुक आहे.' तर तारा सुतारिया म्हणाली, 'अभिनंदन आणि किल.'

हेही वाचा -

  1. रिचा चड्ढाने पती अली फजलसह केली प्रेग्नंन्सीची घोषणा, सेलेब्रिटींनी केला अभिनंदनाचा वर्षाव
  2. तेरी बातों में ऐसा उल्झा जिया : व्हॅलेंटाईन डे साठी परफेक्ट पिक्चर म्हणत प्रेक्षकांनी केले शाहिद-क्रितीच्या रोम कॉमचे कौतुक
  3. रजनीकांतचा 'मोइनुद्दीन भाई' पसंतीस उतरला, प्रेक्षकांनी केला 'लाल सलाम'

ABOUT THE AUTHOR

...view details