मुंबई - 'The Great Indian Kapil Show' Promo Out : कॉमेडी किंग कपिल शर्माचा ओटीटी शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवा प्रोमो बुधवारी 22 मे रोजी रिलीज करण्यात आला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी एपिसोडमध्ये बॉलिवूडचा 'झकास' अभिनेता अनिल कपूर आणि चित्रपट निर्माता-कोरियोग्राफर फराह खान पाहुणे म्हणून येणार आहेत. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' आगामी एपिसोडचा नवीन प्रोमो हा खूप मजेदार आहे. या शोला अनिल कपूर आणि फराह खाननं हायजॅक केल्याचं प्रोमोत दिसत आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा नवा प्रोमो रिलीज :आज कपिलनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा प्रोमो पोस्ट केला आहे. या प्रोमोमध्ये त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "जेव्हा अनिल कपूरचं 1, 2, 4 आणि फराह खानचं 5 6 7 8 कपिलला भेटतात, तेव्हा ब्लॉकबस्टर मनोरंजनाची गारंटी असते." व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये अनिल कपूर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये स्वागत असल्याचं म्हणताना दिसत आहे. शोच्या नवीन जजची ओळख करून देताना अनिल म्हणतो, "पापाजी आमच्या शोचे जज आहेत." यानंतर फराह खान शोच्या जज अर्चना पूरण सिंगची जागा घेण्यासाठी पुढे जाते. यावर अर्चना पूरण सिंग म्हणते, "तुम्ही तिथेच राहा." यावर फराह म्हणते, "तुम्ही देखील दुसऱ्याची सीट घेतली आहे." यानंतर तिथे उपस्थित असलेले लोक हसतात.