महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

आश्वासनांचा पाऊस पडूनही निवडणुकीचा धक्कादायक निकाल, सत्तेपासून 'दलाल' वंचित !

'बिग बॉस १८' मध्येही इलेक्शनचा माहोल पाहायला मिळाला. 'टाईम गॉड' पदासाठी झालेल्या चुरशीचा निवडणूकीचा निकाल मात्र धक्का देणारा ठरला. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा...

Bigg Boss 18
बिग बॉस १८ (बिग बॉस 18 (@colorstv Instagram))

By ETV Bharat Entertainment Team

Published : 4 hours ago

Updated : 3 hours ago

मुंबई - महाराष्ट्रात निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झालेली असतानाच 'बिग बॉस १८' मध्ये जनरल इलेक्शन पार पडली. 'टाईम गॉड' या पदासाठी झालेल्या निवडणूकीसाठी स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. वरवर एकसंध वाटणारे स्पर्धक दोन गटात विभागले गेले आणि या दुफळीमुळे निवडणुकीचा निकाल अनपेक्षित ठरला.

'टाईम गॉड'साठी निवडणूक :'टाईम गॉड'साठीच्या निवडणुकीत अरफीन खान हा आघाडीवर होता. खरंतर तोच सध्या 'बिग बॉस'मध्ये 'टाईम गॉड' होता. परंतु 'बिग बॉस'नं नवी खेळी केली आणि रजत दलालला कन्फेक्शन रुममध्ये बोलवलं. 'टाईम गॉड' बनण्यासाठी त्याच्याकडं दोन पर्याय ठेवले. पहिलं म्हणजे त्यानं स्वतः बनायचं किंवा कुणाला तरी नॉमिनेट करायचं. रजतनं स्वतः व्हायची इच्छा व्यक्त केली. बिग बॉसच्या कन्फेक्शन रुममधून बाहेर पडताना तो अतिशय खूश आणि आनंदात होता. बाहेर येताच सर्व स्पर्धकांनीही त्याचं अभिनंन केलं. टाईम गॉड झाल्याचा आनंद रजत दलालच्या चेहऱ्यावर फार काळ टिकू शकला नाही. काही वेळातर 'बिग बॉस'नं ही गंमत होती म्हणत हवा काढून घेतली. पण 'टाईम गॉड'ची लढत रजत दलाल आणि अरफीन खान यांच्यात होणार असल्याचंही जाहीर केलं.

रजत दलालनं अरफीन खानची लढत : अशा तऱ्हेनं बिग बॉसच्या घरात 'टाईम गॉड'साठी जनरल इलेक्शनचं बिगुल वाजलं आणि धुरळा उडाला. सुरुवात झाली ती निवडणूक प्रचारापासून. अरफीन खाननं सुरुवातीला भाषण करुन आपण 'टाईम गॉड' म्हणून बिग बॉसच्या घरात केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली. आपल्याला पुन्हा संधी मिळाल्यास आणखी उत्तम काम करण्याचं आश्वासनही त्यानं दिलं. रजत दलालनं अरफीनला विरोध करताना जोरदार प्रतिहल्ला केला. अरफिन खान हा 'टाईम गॉड' म्हणून कसा फेल होता, यावर त्यानं भर दिला. आपल्याला संधी मिळाल्यास भरीव काम करुन सेवा करणार असल्याचं आश्वासनं त्यानं दिलं. अखेर 'बिग बॉस'च्या घरात अरफीन खान विरुद्ध रजत दलाल यांच्यात जनरल इलेक्शन पार पडली. 'बिग बॉस'नं मतदान झाल्यानंतर लगेचच मतमोजणीचा निकालही जाहीर केला. यामध्ये दोन्ही उमेद्वारांना आठ - आठ अशी समान मत मिळाल्यानं निकाल अनिर्णित ठेवण्यात आला. अरफीन खानकडे असलेलं 'टाईम गॉड'चा दर्जाही त्यामुळे कमी झाला. रजत दलालसाठी हा पराभव जीवाला लागणारा ठरला. मतदार असलेल्या स्पर्धकांनी मात्र निकालाचं जोरदार स्वागत केलं आणि आनंद व्यक्त केला.

'बिग बॉस'च्या घरात असंतोष : 'बिग बॉस'मध्ये आधीच्या भागात एक मोठं आंदोलन पाहायला मिळालं. 'बिग बॉस १८' मध्ये अविनाश जेलमध्ये आहे. जेलमध्ये असलल्या व्यक्तीकडे राशन वाटपाचा पूर्ण अधिकार असतो. आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी जेलमधील व्यक्ती या राशनवरुन आपला वर्चस्व तयार करण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रमाणेच अविनाशनंही भूमिका घेतली की मला जोपर्यंत रहिवाशी स्वतः येऊन अन्न मागत नाहीत तोपर्यंत त्याला जेवायला मिळणार नाही. नेमक्या याच कारणावरुन बिग बॉस हाऊसमध्ये राडा झाला. सुरुवातीला जेवण बनवण्यासाठी वस्तू मागण्यासाठी अविनाशकडं हात पसरवण्याच्या मुद्यावरुन स्पर्धकांच्यामध्ये असंतोष पसरला. यात मध्यस्थी करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आणि स्पर्धक शिल्पा शिरोडकर अविनाशकडं गेली. तिनं सर्वांना जेवण्यासाठी वस्तू देण्याची मागणी केली. पण इतकं राशन देण्याच्या मूडमध्ये अविनाश नव्हता. शिल्पाचं म्हणणं होतं की ज्यांना जेवायचं असेल त्यांना जेवू दे. त्यावर अविनाश उलट सुलट बोलला. त्यानंतर अफरीन खानला नॉन व्हेज खायची सवय असल्यामुळं त्यानं तशी मागणी केली. यावरुन पुन्हा वाद सुरू झाला.

शिल्पा शिरोडकर भडकली : राशन देण्यासाठी अविनाश आडमुठा भूमिकेत घेत असल्याच्या कारणावरुन शिल्पा शिरोडकर भडकली. जेवणासाठी भिक मागायची का म्हणत रजत दलालसारख्या स्पर्धकांनी बंडाचं निशाण फडकवलं. अविनाशचा हा पवित्रा चुकीचा असल्याचं मत सामुहिकपणे व्यक्त होत असतानाच चाहतनं मांडवली करण्याचा प्रयत्न केला. पण ती अविनाशची बाजू घेत आहे, म्हणत इतर स्पर्धक भडकले. दरम्यान शिल्पानं जेवण मिळत नसल्यानं औषधं न घेता बिग बॉसमध्ये प्राण सोडणार असल्याची भूमिका घेतली. इतर स्पर्धक समजावत असताना ती रडताना दिसली. या गोंधळात चाहतनं भूक आवरत नसल्याचा ड्रामा सुरू केला. ती स्वतःसाठी जेवण बनवण्याची तयारी किचनमध्ये सुरू करु लागली. या काळात इतर स्पर्धकांनी जेवण सगळ्यांना मिळत नसेल तर जेवायचंच नाही असा पवित्रा घेतला. जेवण करत असलेल्या चाहतचा गॅस चूम हिनं बंद केला. यावरुन चूम आणि चाहत यांच्यात धुमशान झाल्याचं पाहायला मिळालं. चूमच्या मदतीला आलेल्या काही स्पर्धकांनी गॅसचा बर्नर आणि इतर वस्तू पळवून नेल्या. हा प्रकार वाढत गेल्यानंतर अविनाशनं जेवण मिळेल, त्यासाठी राशन देण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 18'मधील 'या' स्पर्धकाचा प्रवास संपला, आफरीन खान आणि रजत दलाल येईल आमनेसामने
  2. चाहत पांडेला कसा पाहिजे पती ?, सलमान खानसमोर 'या' व्यक्तीचं नाव घेऊन व्यक्त केल्या भावना
  3. कडक सुरक्षेत 'बिग बॉस'च्या सेटवर पोहोचला सलमान खान, जड अंतःकरणाने म्हणाला, 'मुझे आज आना ही नहीं था'
Last Updated : 3 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details