महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

वरुण धवन स्टारर 'बेबी जॉन'मधील जॅकी श्रॉफचा फर्स्ट लूक आला समोर, पाहा धमाकेदार पोस्टर - JACKIE SHROFF

'बेबी जॉन'मधील जॅकी श्रॉफचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी जॅकीच्या पात्रही चाहत्यांना ओळख करून दिली आहे.

Baby John
बेबी जॉन ('बेबी जॉन'चा 'बब्बर शेर' (Instagram))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 12, 2024, 4:54 PM IST

मुंबई - 'बेबी जॉन'च्या निर्मात्यानं विजयादशमीच्या मुहूर्तावर चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. आज, 12 ऑक्टोबर रोजी निर्मात्यांनी चित्रपटातील जॅकी श्रॉफचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. याशिवाय त्याच्या व्यक्तिरेखेचीही चाहत्यांना ओळख करून दिली आहे. शनिवारी वरुण धवननं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'बेबी जॉन'मधील जॅकी श्रॉफचा फर्स्ट लूक रिलीज करून चाहत्यांना एक भेट दिली आहे. रिलीज केलेल्या फर्स्ट लूकमध्ये जॅकी श्रॉफची पांढरी दाढी आणि लांब केस असल्याचे दिसत आहे. जॅकी श्रॉफच्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लूक उघड करताना वरुण धवननं पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल, अशा अंधाराला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा.' बेबी जॉनचा इव्हिल बब्बर शेर तुमच्यासाठी येत आहे.'

'बेबी जॉन' चित्रपटामधील जॅकी श्रॉफचं फर्स्ट लूक समोर : अलीकडेच 'बेबी जॉन'च्या निर्मात्यांनी वरुण धवनचं नवीन पोस्टर शेअर केले आहे. रिलीज केलेल्या पोस्टरमध्ये वरुण खूपच इंटेंस लूकमध्ये दिसत होते. यात त्याचे केस लांबआणि त्याची दाढीही खूप वाढली असल्याची दिसली होती. 'बेबी जॉन'चे दिग्दर्शन ए कालीस्वरण यांनी केले आहे. या चित्रपटाच्या रिलीजची वाट अनेकजण पाहात आहेत. या चित्रपटामध्ये वरुण हा अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. दरम्यान जॅकी श्रॉफच्या व्हायरल झालेल्या पोस्टरवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन चित्रपट पहिल्याचं दिवशी पाहाणार असल्याचं सांगताना दिसत आहेत.

'बेबी जॉन' चित्रपटाची स्टार कास्ट : 'बेबी जॉन' चित्रपटात वरुण धवन व्यतिरिक्त कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटातून कीर्ती सुरेश ही हिंदी चित्रपसृष्टीत पदार्पण करत आहे. अ‍ॅटली हा चित्रपट जिओ स्टुडिओ आणि सिने वन स्टुडिओच्या सहकार्यानं निर्मित करत आहे. या चित्रपटाच्या टीझरला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाची निर्मिती मुराद खेतानी, प्रिया अटली आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहेत. 'बेबी जॉन' हा चित्रपट या ख्रिसमसला 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. वरुण धवनची पत्नी नताशा दलालच्या बेबी शॉवरची झलक मीरा राजपूतनं केली शेअर - Meera Rajput
  2. वरुण धवन 'दुल्हनिया 3'सह प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सज्ज
  3. वरुण अन् नताशा अलीबागहून परतले मुंबईला

ABOUT THE AUTHOR

...view details