पुणे - प्रतिष्ठीत पीफ फिल्म फेस्टीव्हलची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा २३ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत पार पडेल. पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमानं या फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येतं. यावर्षीचा हा उत्सव पीव्हीआर, पॅव्हिलियन मॉल, आयनॉक्स - बंडगार्डन आणि सिनेपोलीस-औंध येथे ११ स्क्रीनसमध्ये आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व पुणे फिल्म फाउंडेशनचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व पुणे फिल्म फाउंडेशनचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी याबाबत माहिती दिली. या चित्रपट महोत्सवात जागतिक व मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभाग यांमध्ये सुमारे १५० हून अधिक देशी विदेशी चित्रपट रसिक प्रेक्षकांना बघता येणार आहे. तसेच शोमॅन राज कपूर यांची १००वीं जयंती ही या वर्षाची थीम असणार आहे. जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात यंदा १०७ देशांमधील १०५७ हून अधिक चित्रपटांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक मंडळाने हे सर्व चित्रपट बघून त्यातील १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे. अंतरराष्ट्रीय ज्युरींमार्फत अंतिम फेरीतील हे १४ चित्रपट बघून सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपट निवडला जाणार आहे आणि त्यास 'महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' - १० लाख रुपये देऊन समारोप कार्यक्रमात गौरवलं जाईल,अस यावेळी पटेल म्हणाले.
यंदा जागतिक चित्रपट स्पर्धा विभागात निवडण्यात आलेल्या १४ चित्रपटांची यादी पुढील प्रमाणे :
१. डार्केस्ट मीरियम, दिग्दर्शक - नाओमी जये, कॅनडा
२. ऑन द इन्वेंशन ऑफ स्पीशीज़, दिग्दर्शक - तानिया हरमीड, इक्वाडोर, क्यूबा
३. टू अ लँड अननोन, दिग्दर्शक - मह्दी फ्लेफेल, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ग्रीस, कतार, सौदी अरेबिया, पॅलेस्टाईन
४. ग्रैंड टूर, दिग्दर्शक - मिगुएल गोम्स, पोर्तुगाल, इटली, फ्रान्स
५. अरमंड, दिग्दर्शक - हलफदान उल्लमांन तोंडेल, नॉर्वे, नेदरलँड, जर्मनी, स्वीडन