महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

शाहिद आणि क्रिती अभिनीत 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' ची संथ गतीनं कमाई - शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन

BMAUJ box office Collection Day 1 : 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर संथ गतीनं कमाई करत आहे. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कलेक्शन केलं हे जाणून घेऊ या.

BMAUJ box office Collection Day 1
'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' बॉक्स ऑफिसचा पहिला दिवस

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2024, 11:38 AM IST

Updated : Feb 10, 2024, 2:32 PM IST

मुंबई - TBMAUJ box office Collection Day 1 :अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' 9 फेब्रुवारी रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संथ ओपनिंग मिळालं आहे. हा चित्रपट 75 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला आहे. शाहिद आणि क्रितीनं पहिल्यांदाच एकत्र काम केलंय. ''तेरी बातों में ऐसा उलझा जिया' रोमँटिक ड्रामा असून या चित्रपटामध्ये शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनशिवाय डिंपल कपाडिया, राकेश बेदी, राजेश कुमार, आशीष वर्मा, धर्मेंद्र, अर्जुन पांचल आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाला रिलीज होऊन एक दिवस झाला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 6.50 कोटींची कमाई केली आहे. आज 10 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट 8 ते 10 कोटी रुपये कमाई करेल, अशी अपेक्षा केली जात आहे. 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'तील काही चुंबनदृश्यं कापल्यानंतर, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं U/A प्रमाणपत्र दिल आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमित जोशी, आराधना साह यांनी केलंय. हा चित्रपट मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओजची निर्मिती आहे. क्रिती सेनॉनला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत, कारण यापूर्वी तिचा प्रभासबरोबरचा 'आदिपुरुष' हा चित्रपट खूप वाईट प्रकारे फ्लॉप झाला होता. 'आदिपुरुष' चित्रपटाबद्दल देशात खूप वाद निर्माण झाला होता. या चित्रपटामधील अनेक संवाद वादग्रस्त होते.

शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन वर्कफ्रंट :शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शेवटी शाहिद 'ब्लडी डॅडी'मध्ये दिसला होता. आता त्याचा आगामी 'बुल' आणि 'देवा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. दुसरीकडे क्रिती पुढं 'हाऊसफुल्ल 5' आणि 'किल बिल' आणि 'द क्रू' या चित्रपटांमध्ये असणार आहेत.

हेही वाचा :

  1. मिस वर्ल्डसाठी भारतात येणाऱ्या स्पर्धकांच्या पाहुणचारासाठी मानुषी छिल्लर उत्साही
  2. 90 वर्षांचा इतिहास अभिमानाने मिरवणारे चर्चगेट येथील इरॉस सिनेमागृह, 7 वर्षांनी नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला
  3. सारा अली खानने आई अमृता सिंगच्या वाढदिवसानिमित्त लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट
Last Updated : Feb 10, 2024, 2:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details