मुंबई - TBMAUJ X Review: शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांची मुख्य भूमिका असलेला 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा चित्रपट अखेर शुक्रवारी सिनेमागृहात दाखल झाला. गेल्या वर्षी त्याच्या ओटीटी प्रोजेक्ट्स 'फर्जी' आणि 'ब्लडी डॅडी'सह चाहत्यांना खूश केल्यानंतर शाहिद कपूर ते नवीन 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटासह दोन वर्षांनंतर सिनेमागृहात परतला. दिनेश विजानच्या मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओज निर्मित या चित्रपटात क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत आहे आणि अमित जोशी आणि आराधना साह या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.
'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा एक साय-फाय रोमान्स कॉमेडी म्हणून प्रचार झालेला चित्रपट आहे. यामध्ये क्रिती सेनॉनने सिफ्रा (सुपर इंटेलिजेंट फीमेल रोबोट ऑटोमेशन) नावाच्या रोबोटच्या भूमिकेत आहे, तर शाहिद कपूर आर्यन नावाच्या एका वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे. लांब लचक शीर्षक असलेल्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट पाहणाऱ्यांनी त्याच्या ट्रेलर आणि संगीताला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. हा शाहिद कपूरचा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. यात तो क्रिती सेनॉनची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून देतो. तो ज्या स्त्रीच्या प्रेमात पडला आहे ती प्रत्यक्षात एक रोबोट आहे याची त्याला पुसटशीही कल्पना नाही.
चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, पोस्टर्स आणि गाण्यांनी फिल्मी जगतात खळबळ उडवून दिली आहे, त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शाहीद-क्रिती ब्लॉकबस्टरचे पहिले रिव्हयु बहुतेक सकारात्मक आहेत. शाहिद आणि क्रितीच्या अत्यंत अपेक्षित कौटुंबिक मनोरंजनाबद्दल प्रेक्षक सकारात्मक वाटत आहेत.
सोशल मीडिया X वर चित्रपट पहाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एक युजर लिहितो, ''साय फाय टचसह गोड रोम-कॉम. ही एक सुंदर आणि विनोदाने भरलेली प्रेमकथा आहे. शाहिद कपूरला कॉमिक भूमिकेत पाहून आनंद झाला आणि क्रिती सेनॉनच्या रोबोटनं मला भरपूर हसवलं. व्हॅलेंटाईन डे साठी एक परिपूर्ण चित्रपट.''